Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : राज-उद्धव एकत्र येणार? राजकीय भुकंपानंतर ठाकरे गटाची आज बैठक; भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Uddhav Thackeray Latest Update : उद्धव ठाकरे गटाकडून बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे सर्व आमदार-खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रोहित कणसे

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सराकरमध्ये सामील होण्याची निर्णयाने राज्यात राजकीय भुकंप पाहायला मिळाला. यानंतर राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे हे राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता मुंबईतील शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे गटाकडून बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे सर्व आमदार-खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आजच्या बैठकीत पुढे महाविकास आघाडीमध्ये राहायचं की एकला चलोचा मर्ग स्वीकारायचा याबद्दलची भूमिका उद्धव ठाकरे आज जाहीर करण्याची शक्यता आहे.

'एकला चलो' चा नारा देणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर "उद्धव ठाकरे यांनी आता 'सत्तांतर करो', 'एकला चलो'चा नारा देऊन लोकांमध्ये जायला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे." असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

राज-उद्धव एकत्र येणार?

महाराष्ट्रातील राजकीय भुकंपानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवन परिसरात काही बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवरीत आता तरी एकत्र या, अशी मागणी करण्यात आली होती.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणाऱ्या बॅनरवर "महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला. राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे" असा मजकूर लिहीलेला होता. दरम्यान या बॅनरमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा देखील जोरात सुरू होती. याबद्दल उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार का याकडे देखील दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT