Eknath shinde and uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

शिंदेंना शह देण्याची ठाकरे गटाची तयारी; राष्ट्रीय कार्यकारणीबाबत घेतला मोठा निर्णय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी निवडणुक आयोगात आणि सर्वोच्च न्यायालायात वाद सुरू आहे. त्यातच मुळ शिवसेना पक्षाच्या कार्यकारणीची अर्थात उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाची मुदत उद्या २३ जानेवारी रोजी संपत आहे. याबाबत निवडणूक आयोगात देखील युक्तीवाद झाला. मात्र निवडणूक आयोगाने यावर काहीही भूमिका न घेतल्याने ठाकरे गटाकडून कार्यकारणीची बैठकीच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांनी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आयोगाला विनंती केली होती. अन्यथा सद्यस्थिती कायम ठेवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे, मग यानंतरही त्यांच कार्याध्यक्षपद कायम राहणार का, हा सर्वात मोठा प्रश्न होता.

यावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे गटाने उद्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीचं आयोजन केल्याचं वृत्त साम टीव्हीने दिलं आहे. अर्थात या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढू शकतो. मात्र या बैठकीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोने खरेदीच्या तयारीत आहात? तर आधी हे वाचाच! सोने आणि चांदीच्या दरात अजून घसरण होणार का? तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Supreme Court Orders Mamata Banerjee Government : सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का! ; २० लाख कर्मचाऱ्यांना २५ टक्के महागाई भत्ता द्यावा लागणार

लग्नाआधीच मृणाल ठाकूर गरोदर? अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Yeola Farmers Protest : कांद्याला हमीभाव द्या! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून 'रास्ता रोको'

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांचा माजी आमदारांना फोन

SCROLL FOR NEXT