Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटात परतीचे वारे? स्वगृही परतण्यास इच्छूक 'त्या' आमदाराचं नाव ठाकरे गटाकडून उघड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेत ऐतिहासिक बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीत जावून सरकार स्थापन केलं. शिवाय मुख्यमंत्रीपदही मिळवलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झाल्याची चर्चा होती. मात्र शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं काही दिवसांपूर्वीच उघड झालं होतं. त्यात आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वात आधी स्वगृही कोण परतणार त्या आमदारांचं नाव उघड केलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, स्वगृही परतणारे पहिले आमदार संजय शिरसाट असतील. शिरसाट अस्वस्थ आहेत. त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांना मंत्रीपदं मिळाली आहेत. त्यामुळे शिरसाट यांच्या आशा मावळल्याच त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

दरम्यान शिंदे गटाकडून कार्यकारणीची पद जाहीर झाली आहे. त्यातही शिरसाट यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे सर्वाधिक पश्चाताप शिरसाट यांना होतोय. त्यामुळे संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

दरम्यान संजय शिरसाट हे औरंगाबादमधील आमदार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांच्या परतण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा शिंदे गटाला मोठा धक्का ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election : युतीत शिंदेसेनेला हव्यात २२ जागा; शिवसेनेच्या नेत्यांनी केले स्पष्ट

Pranita Kulkarni: मतदानाला गेला नाहीस तर पैसे का घेतले? भाजप नगरसेविकेचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये भररस्त्यावर तरुणांची गुंडागर्दी; दगडफेक व काठ्यांनी हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Kolhapur Administration : बिबट्या आला तेव्हाच जागे होणार का? साहित्य खरेदीत प्रशासनाची गंभीर बेपर्वाई

Nagpur Crime : थर्टी फर्स्टपूर्वी नागपूर हादरले! पार्टीनंतर खुनी हल्ला, तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

SCROLL FOR NEXT