Anil Parab News esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाला हात लावायची हिंमत कुणातच नाही; अनिल परबांचा CM शिंदेंना इशारा

'उद्धव ठाकरे हे आजही आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि उद्याही राहतील.'

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्ष (Shiv Sena) व निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे या वादावरील सुनावणी आता 30 जानेवारीला होणार आहे.

Anil Parab News : शिवसेना पक्ष (Shiv Sena) व निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे या वादावरील सुनावणी आता 30 जानेवारीला होणार आहे. शुक्रवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापला युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही बाजूंना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगितलंय.

त्यानंतर 30 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी निकाल येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. याबाबत उद्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडं त्यांची भूमिका मांडली जाणार आहे.

याबाबत शिवसेना नेते व आमदार अनिल परब (Anil Parab) यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाला हात लावायची हिंमत कोणातही नाही अशी प्रतिक्रीया दिली. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निकाल काहीही लागला तरी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि पक्षप्रमुखच राहणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना परब पुढं म्हणाले, या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत. त्या तांत्रिक बाबींना आम्ही जास्त महत्व देत नाही. त्याची जी लढाई आहे ती निवडणूक आयोगासमोर चालू आहे. उद्धव ठाकरे हे आजही आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि उद्याही राहतील. निवडणूक आयोगासमोर फक्त औपचारिक मुद्दा आहे. शिवसैनिक जोपर्यंत मानतोय, तोपर्यंत त्यांच्या पक्षप्रमुख पदाला हात लावायची हिंमत कुणातच नाही, असा इशारा परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेता दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT