Gulabrao Patil on Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: '...अन् रोख 51 हजारांचं बक्षिस घेऊन जा', ठाकरे गटाचं गुलाबराव पाटलांना चॅलेंज

उद्या पाचोऱ्यामध्ये ठाकरे गटाची सभा मात्र या सभेपूर्वी राजकारण चांगलंच तापलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना (शिंदे गटाचे) मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमधील पाचोऱ्यात उद्या रविवारी ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच तेथील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं नाही तर सभेत घुसणार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याला आता ठाकरे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांच बक्षिस घेऊन जा, असं चॅलेंज ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. आता यावर गुलाबराव पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. रविवारी पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेआधीच राजकारण तापलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून समाचार घेतला आहे.

सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचं बक्षिस घेऊन जा असं आव्हान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून गुलाबराव पाटील यांना देण्यात आलं आहे. तसचं गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

तर जळगाव येथे ठाकरे गटाची सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत जळगावात पोहोचले आहे. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT