Uddhav Thackrey  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला ठाकरे गट उत्तर देणार नाही; कारण..

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस पाठवली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेतील फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीला उत्तर न देण्याची भूमिका ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतली आहे.(Latest Marathi News)

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी काही दिवसांपुर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसात उत्तर मागितले होते. मात्र मुदत संपूनही ठाकरे गटाकडून या नोटिशीला उत्तर देण्यात आलेलं नाही.(Latest Marathi News)

शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रच्या संदर्भात आम्ही कारवाईची मागणी केली असताना यामध्ये 16 आमदारांनीच नोटिशीला उत्तर देणे गरजेचं असल्याचं मत ठाकरे गटाकडून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या इतर आमदारांनी नोटिशीला उत्तर देण्याची गरज नसल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.(Latest Marathi News)

त्याचबरोबर, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र देखील दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिलेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह इतर आमदरांना नोटीस दिली होती.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT