Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Hearing Sakal Digita
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे-शिंदे वाद! आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुनावणी आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष रेंगाळणार अशी चिन्हे आहेत. १२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ती १० दिवस लांबणीवर पडली आहे. (Shinde-Thackeray news in Marathi)

आतापर्यंत शिंदे-ठाकरे वादासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यातच सरन्यायाधीश एन.व्ही. रमना हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे वाद रेंगाळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने देखील रमना यांना पुढील सरन्यायाधीश कोण असतील अशी विचारणा केली. त्यामुळे सध्या सुनावणी होत असलेल्या शिंदे-ठाकरे याचिकांवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रमना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे-शिंदे गटांच्या पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत चार वेळा सुनावण्या झाल्या आहेत. मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान रमना यांनी न्यायमूर्ती उमेश ललित यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार पुढील सरन्यायाधीश पदासाठी उमेश ललित यांचं नाव निश्चित झालं आहे. एकूणच न्यायालयात सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. तर रमना यांनी देखील ठाकरे-शिंदे गट प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपविण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत ठोस निकाल लागतो की, हे प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग केले जाते, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT