Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी अनुपस्थित

Shivsena MLA Disqualification Case: कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी अनुपस्थिती राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेली दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा आज (ता. १०) सुटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज (बुधवारी ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आहेत. मात्र, या कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी अनुपस्थिती राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल देसाई कोल्हापुरात तर अनिल परब मुंबईबाहेर आहेत. आमदार अनिल परब आणि आमदार अनिल देसाई निकाल वाचनाच्या वेळी विधानभवनात उपस्थित नसणार आहेत. सुप्रीम कोर्टातली कायदेशीर लढाई, निवडणूक आयोगातील लढाई आणि विधान भवनातील अध्यक्षांच्या समोरील सुनावणी या सगळ्या लढाईत दोन्ही नेत्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली होती. आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वेळी ठाकरे गटाकडून वकील उपस्थित राहणार आहेत.

शिंदे गटाच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश

तर मुंबईतल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावण्यात आलं आहे. दुपारी 3 वाजता शिंदे गटाच्या आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब भवनात एकत्र येऊन आमदार विधानभवनात जाणार आहेत.

आमदार अपात्रता निकाल लाईव्ह बघता येणार

शिवसेना आमदार अपात्रता निकाल आता लाईव्ह बघता येणार आहे. तत्पूर्वी विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांची बैठक सुरू आहे. विधिमंडळातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकीला सुरुवात झाली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. त्याआधी नियोजन कसे आहे, याचा आढावा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT