Thackeray vs shinde chief justice d y chandrachud read marathi letter for supreme court  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Thackeray Vs Shinde : …अन् सरन्यायाधीश धावून आले; सर्वोच्च न्यायालयात वाचून दाखवलं मराठी पत्र

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटात शिवसेना कोणाची यावरून सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे दोन्ही शिंदे गटाला दिलं. यानंतर ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.याची सुनावणी धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुरू आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचं पत्र हे मराठीतील पत्र कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर सादर केलं होतं. हे पत्र मराठीतून असल्याने थेट सरन्यायाधीश चंद्रचुड मदतीला धावून आले. त्यांनी हे पत्र मराठीतून वाचून दाखवलं. तसेच कोर्टासाठी त्याचे भाषांतर देखील करुन सांगीतले.

न्यायमुर्ती कोहली यांनी सरन्यायाधीशांना शिवसेनेच्या कार्यकारणीचे मराठी पत्र वाचण्याबाबत विचारणा केली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठीत असलेलं हे पत्र वाचून दाखवलं.

हे पत्र वाचल्यानंतर या २०१९ च्या पत्रानुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. उद्धव ठाकरेंकडे अधीकार होते आणि इतरांनी अनुमोदन दिलं, हे सरन्यायाधीशांनी यावेळी कोर्टात स्पष्ट केलं.

२०१९ मध्ये शिवसेनेत कोणाकडे काय अधीकार होते, कोणती पदे होती हे सांगण्यासाठी कपिल सिब्बल यांच्याकडून हे पत्र सादर करण्यात आलं होतं. याद्वारे ५६ आमदारांनी निर्णयांचे अधीकार उद्धव ठाकरेंना दिले होते हा सांगण्याचा तसेच ठाकरे गटाने नियुक्त केलेली व्हिप हेच कसे अधिकृत आहेत ते सांगण्याचा प्रयत्न याच्या मदतीने ठाकरे गटाकडून केला जातो आहे.

शिवसेनेची निवडणूक २३ जानेवारी २०१८ रोजी झाली. तर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही २०१८ मध्ये झाली होती. तेव्हा एकनाथ शिंदे चौथ्या क्रमांकाचे नेते होते. असेही ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.

चंद्रचुड यांचं महाराष्ट्र कनेक्शन

सरन्यायाधीश चंद्रचुड यांचं महाराष्ट्र कनेक्शन फार जुनं आहे. यांच्या मराठीशी जवळचा संबंध आहे. कणेसर तालुक्यातील खेड हे त्यांचं मूळ गाव आहे. धनंजय चंद्रचुड यांचे वडील माजी सरन्यायाधीश यशवंतराव विष्णू चंद्रचूड तर आई प्रभा चंद्रचूड या विद्वान शास्त्रीय गायिका होत्या. न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण देखील मुंबईत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्जेंटिना दौरा हा भारत आणि अर्जेंटिनामधील खोलवर रुजलेल्या संबंधांचं प्रतीक - अजनीश कुमार

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT