Neelam Gorhe Esakal
महाराष्ट्र बातम्या

Neelam Gorhe: नारायण राणेंच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेचं प्रतिउत्तर म्हणाल्या हे तर चिंटूचे जोक्स

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात नीलम गोऱ्हेंना पद मिळालं नाही

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे पक्षात नाराज होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात त्यांना पद मिळालं नाही म्हणून त्या नाराज होत्या. त्यामुळे त्या शिवसेना सोडून जाणार होत्या. मी केलेल्या शिफारशीमुळे त्या पक्षात पुन्हा थांबल्या, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केला. राणे यांच्या या वाक्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या म्हणण्यात काही तथ्य नाही असं नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या की, नारायण राणे यांचं विधान हस्यास्पद आहे. राणे यांचं विधान हे चिंटूचे जोक्स आहेत. माझं त्यांच्याशी कधी काहीही बोलणं झालं नाही. त्याचबरोबर 2004 नंतर मी त्यांना कधी भेटलेही नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. तसेच मी शिंदे गटात जाणार नाही. मला तशी गरजच वाटत नाही, असंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी काल ट्रायडंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांबरोबर नीलम गोऱ्हे यांची तासभर चर्चा केली. या चर्चामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. गोऱ्हे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली तेव्हा तिथे ओमप्रकाश बिर्लाही होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते. यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT