Thane, kalyan, dahagaon, confident woman,Drive Car, 89 year old woman Drive Car  
महाराष्ट्र बातम्या

याला म्हणतात आत्मविश्वास! 89 वर्षांची आजी बिनधास्त चालवते कार (VIDEO)

सुशांत जाधव

89 Year Old Woman Can Drive Car : कधीही कारमध्ये न बसलेली आजी. त्यात आजीचं वय 89 वर्षे. पण, तिच आजी बिनधास्त कार चालवते, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. जर, तुम्ही ठरवलं तर काहीही साध्य करता येते. याचे एक उदारहणच ठाणे जिल्ह्यात, कल्याण तालुक्यातील दहागाव येथील आजीबाईंनी दाखवून दिलय. आजींना चार वर्षांपूर्वी नातवाने कार चालवण्याचे धडे दिले होते. चार वर्षांनी नातवाने पुन्हा आजीला विचारलं, 'कार चालवणार का?' चार वर्षांपूर्वी शिकवलेलं सगळं लक्षात ठेवून आजीनं कार चालवून दाखवली.

कल्याण जवळ असलेल्या दहागाव या खेडेगावमध्ये राहणारी आजी आयुष्यात कधीही कारमध्ये ड्रायव्हर सीटवरही बसली नसेल. पण, ती आज स्वत: कार चालवते. गंगाबाई केशव मिरकुटे असं या आजीबाईंच नाव. त्या  ठाणे जिल्ह्यातील कल्याण गावातील दहागाव या छोट्याशा खेड़्यात राहतात.  3-4 वर्षांपूर्वी आजीबाई थोड्याफार आजारी होत्या. त्यांना भेटण्यासाठी आलेला त्यांचा नातू विकास भोईर यांनी आपल्या आजीला कार चालवणार का? असा प्रश्न विचारला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर त्यांनी मला जमेल का? असा प्रतिप्रश्न करून शिकण्याची इच्छा व्यक्त केली. आजीचा हा अंदाज नातवाला चांगलाच भावला. त्याने आजीला गाडीत बसवून मैदानात नेले. काल कशी चाववावी याचे धडे त्यांनी आपल्या आजीला दिले. क्लच, गिअर, ब्रेक, स्ट्रेअरिंग आणि एक्सलेटर बद्दल माहिती देत त्याने आजीला गाडी चालवायला सांगितले. नातवाच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी कार चालवली. 

त्यानंतर जवळपास 3-4 वर्षानंतर विकास भोईर पुन्हा कार चालवणार का? असा प्रश्न आपल्या आजीला केला. यावेळी आजीबाईंना क्लच, गिअर, ब्रेक, स्ट्रेअरिंग आणि एक्सलेटरबद्दल पहिल्यांदा दिलेली माहिती लक्षात होती. वृद्धापकाळात नवीन गोष्टी शिकणे कठीण असते. स्मरण शक्तीही फार नाही. पण, या आजींनी या गोष्टीला अपवाद असतात. छोट्या-मोठ्या आजारातून बरे होण्यासाठी आजी अशा काही तरी, नवीन गोष्टी करतात. आजींची ही कहाणी प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे. जगात अशक्य काही नसते गरज असते ती, एखादी गोष्ट समजून घेऊन ती शक्य करून दाखवण्याची इच्छा शक्तीची!  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT