Hasan Mushrif  
महाराष्ट्र बातम्या

इटली-स्पेनच्या सहलीसाठी 15 दिवसांची रजा मंजूर केल्याबद्दल जनतेचे आभार.. मुश्रीफांची पोस्ट व्हायरल

Hasan Mushrif post goes viral: राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुश्रीफांनी इटली- स्पेनच्या सहलीसाठी १५ दिवसांची रजा मंजूर केल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी 'एक्स' सोशल मिडिया हँडलवर या संदर्भात पोस्ट केली आहे. त्यांची पोस्ट चर्चेचा मुद्दा ठरली आहे.

मुश्रीफ आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार. इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी जात असलेल्या गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून पंधरवड्याची रजा मंजूर करून घेतली आहे. शुक्रवारपासून दि. १० ते २४ वैद्यकीय सेवा सुरूच राहील.......!

१० ते २४ मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ - ५ या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे, असं ते म्हणालेत.

मुश्रीफ परदेश दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे. या फलकावर लिहिलेले आहे, चार जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा...! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील, याची खात्री व्यक्त केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT