The Assembly Speaker Sakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षाची निवड होणार पुढील आठवड्यात

त्याबाबत मंत्रिमंडळ राज्यपालांना ठराव पाठवणार

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : निवडणुकीची (Election) नोटिस १० दिवसांवरून १ दिवसावर आणणारी सुधारणा आज विधानसभेने पारित केल्याने येत्या अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळू शकेल. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीची तारीख राज्यपालांनी घोषित करायची असल्याने तशी विनंती करणारा मंत्रिमंडळाचा ठराव राजभवनाकडे पाठवला जाणार आहे. आज ही निवडणूक २७ तारखेला घ्यायची की २८ ला याचा निर्णय मंत्रिमंडळ घेईल. यासंबंधीची शिफारस मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने केल्यानंतर ती राज्यपालांना मान्य करावी लागेल.

या अधिवेशनात रिक्त झालेले आमचे पद भरून द्या असा आग्रह काँग्रेसने लावून धरला होता. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज नियम समितीची बैठक घेण्यात आली. खुल्या मतदानाचा स्वीकार आणि पूर्वसूचना १० दिवसांवरून एक दिवसावर नेण्याच्या बदलांवर तब्बल ४३ आमदारांनी आक्षेप घेणाऱ्या शिफारसी केल्या होत्या. त्या आज नियम समितीत बहुमताने फेटाळून लावण्यात आल्या. मविआच्या ४ सदस्यांपुढे नियम समितीतील भाजपची तीन ही संख्या कमी पडली. भाजपच्या समितीतील अन्य सदस्यांचे निलंबन झाले आहे.

सभागृहात हा अहवाल

सादर झाल्यावर तो आवाजी मतदानाने पारित झाला तर नियम धाब्यावर बसवत असल्याचा आक्षेप घेत भाजपने सभात्याग केला. सत्तारुढ आघाडी नियमानुसार या निर्णयाचे राजपत्र छापणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तारीख ठरवून तशी शिफारस राज्यपालांना केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT