students are doing copy while sakal
महाराष्ट्र बातम्या

माध्यमिक शिक्षण कार्यालयातील 'स्कॉड मॅडम'चा दणका! कपड्यात अन्‌ ओढणीत लपविलेली कॉपी शोधून काढलीच; बारावीच्या परीक्षेत २ दिवसात ३ विद्यार्थी पकडले

बारावीच्या परीक्षेत बुधवारी वाणिज्य शाखेच्या चिटणिसाची कार्यपद्धती या पेपरवेळी मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय केंद्रातील एका विद्यार्थिनीने ओढणीत पिन लावून ठेवलेली कॉपी भरारी पथकाने शोधून काढली.

तात्या लांडगे

सोलापूर : बारावीच्या परीक्षेत बुधवारी वाणिज्य शाखेच्या चिटणिसाची कार्यपद्धती या पेपरवेळी मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय केंद्रातील एका विद्यार्थिनीने ओढणीत पिन लावून ठेवलेली कॉपी भरारी पथकाने शोधून काढली. गुरुवारी (ता. २९) विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपरवेळी माळशिरसमधील पिराळे केंद्रावर व कुर्डुवाडीतील भिसे कॉलेजवरील प्रत्येकी एका विद्यार्थिनीस कॉपी करताना भरारी पथकाने पकडले. भिसे कॉलेजवरील मुलीने कपड्यात कॉपी लपविली होती, असे भरारी पथकातील सूत्रांनी सांगितले.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली असून, भाषा विषयाच्या पेपरला कोणीही कॉपी करताना सापडले नाही. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून महसूल व जिल्हा परिषदेची एकूण ४६ भरारी पथके नेमली आहेत. जिल्ह्यात बारावीची १६ संवेदनशील केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांची अंगझडती घेतली जाते. तरीपण, न दिसेल अशा ठिकाणी अनेकजण कॉपी लपवितात. त्याचा भरारी पथकांकडून शोध घेतला जातो. गुरुवारी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता.

जिल्ह्यातील २९ हजार १६४ पैकी २८४ विद्यार्थी विविध कारणांमुळे परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. २८ हजार ८८० विद्यार्थ्यांमध्ये दोनजण कॉपी करताना पकडले गेले. उद्यापासून (शुक्रवार) दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत असून, जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर ६५ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने भयमुक्त वातावरणात पेपर लिहावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.

‘स्कॉड मॅडम’कडून पहिली कारवाई

मंगळवेढा, माळशिरस व कुर्डुवाडी या तालुक्यांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्यावर कॉपीप्रकरणी भरारी पथकाने कारवाई केली आहे. त्यांचा अहवाल बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे. ‘स्कॉड मॅडम’ म्हणून ओळख असलेल्या उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी दोन विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई केली आहे. गोंदिया या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेवेळी एकाच वर्षी ६५ विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. चिटणिसाची कार्यपद्धती व रसायनशास्त्र या पेपरवेळी त्यांनी दोन कारवाया केल्या. या परीक्षेत बुधवारी जिल्ह्यातील पहिली कॉपी केस त्यांनीच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT