Aryan Khan Sakal
महाराष्ट्र बातम्या

आज मिळणार का जामीन? आर्यन खानच्या जामीनावर आज पुन्हा सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: क्रूज ड्रग्ज प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. गेल्या 19 दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता शहारुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या कस्टडीत आहे. क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानला काल मंगळवारी देखील जामीन मिळाला नाही.

हायकोर्टामध्ये त्याच्या जामीन अर्जावर आज बुधवारी देखील सुनावणी जारी राहिल. आर्यन खानची बाजू मांडताना माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी युक्तीवाद केला की, आर्यन खानच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा एनसीबीकडे नाहीये. त्यांच्याकडून कसलेही ड्रग्स प्राप्त झालेले नाहीयेत तरीही कोणतीही ठोस साक्ष उपलब्ध नसताना त्याला 20 दिवसांपर्यंत तुरुंगात ठेवणं योग्य नाहीये.

आर्यन खानची अटक ही चुकीच्या पद्धतीने केली गेली असल्याचा दावा त्याचे वकिल मुकूल रोहतगी आणि सतीश मानशिंदे यांनी केला. त्याचा या सगळ्या प्रकरणाशी कसलाही संबंध नसून एनसीबीजवळ कसलाही ठोस पुरावा नाहीये की तो ड्रग्सचे सेवन करतो, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. यावेळी एनसीबीने कोर्टात सांगितलं की, आर्यन फक्त ड्रग्स घेतच नाही तर त्याची अवैध रित्या तस्करी देखील करण्यामध्ये त्याचा सहभाग आहे.

आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळले आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT