Vinayak Mete 
महाराष्ट्र बातम्या

विनायक मेटेंचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात; गाडीत होते सहा जण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ( Vinayak Mete accidental death news in Marathi)

शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते यांनी विनायक मेटेंच्या निधनाआधी त्यांच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

यासंदर्भातील स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. रांजणगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचे मालक कम चालक संदीप विर याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी करण्यात आली आहे. ३ तारखेला या गाडीच्या चालकासह त्यांच्या सोबत ६ जण होते. ६ जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्या कारणाने ते शिरूरला गेले होते. तसेच त्यांचे नातेवाईक देखील शिरूर मध्ये असून ते त्या कारणाने तिथं गेले होते, असं चौकशीमधून समोर आलं आहे. या प्रकरणी पुढील चौकशी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT