mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

‘महसूल’कडून होईना पदोन्नतीचा निर्णय! ‘कास्ट व्हॅलिडीटी’वर अध्यक्षांची स्वाक्षरी घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मुंबईला हेलपाटे; एका अध्यक्षांकडे १० जिल्ह्यांचा पदभार

सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे दहा जिल्ह्यांचा पदभार असून समितीचा एक सदस्य सांगलीत आहेत. सध्या सदस्य सचिव एकटेच पूर्णवेळ कार्यरत आहेत. दररोज कास्ट व्हॅलिडीटीसाठी सुमारे १५० अर्ज दाखल होत आहेत, पण अध्यक्षांविना अनेकांना वेळेत प्रमाणपत्र देता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे दहा जिल्ह्यांचा पदभार असून समितीचा एक सदस्य सांगलीत आहेत. सध्या सदस्य सचिव एकटेच पूर्णवेळ कार्यरत आहेत. दररोज कास्ट व्हॅलिडीटीसाठी सुमारे १५० अर्ज दाखल होत आहेत, पण अध्यक्षांविना अनेकांना वेळेत प्रमाणपत्र देता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सोलापूरच्या समितीने त्यांच्याकडील ६५० प्रमाणपत्रे रेल्वेने मुंबईला पाठवून अध्यक्षांच्या स्वाक्षरी करुन आणल्या असून आता आणखी एक हजार फाईल्स स्वाक्षरीसाठी अध्यक्षांकडे पाठविण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीचा पदभार रविराज फल्ले यांच्याकडे सोपविण्यात आला असून त्यांच्याकडे आणखी मुंबई उपनगर, मुंबई शहर, सोलापूर, पालघर, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सांगली आणि सिंधुदुर्ग या समित्यांचाही पदभार आहे. पाच दिवसांच्या आठवड्यात त्यांना दैनंदिन कामकाज पाहून अतिरिक्त पदभार दिलेल्या नऊ समित्यांचे देखील काम करावे लागत आहे. त्या समित्यांच्या कार्यालयात जाऊन कामकाज पाहणे सोयीचे नसल्याने अध्यक्षांनी या जिल्ह्यांमधील जात पडताळणी प्रमाणपत्रे आपल्याकडे मागवून घेतली आहेत. मुंबईत बसून ते सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत स्वाक्षऱ्या करीत असल्याचे चित्र आहे. अशी विदारक स्थिती असताना देखील समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष दिले जात नसल्याने पालक, विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

प्रमाणपत्र लवकर वेळेत असे नियोजन

माझ्याकडे सध्या दहा जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचा पदभार असून माझ्याकडे मूळ मुंबई समितीचा पदभार आहे. पण, प्रमाणपत्राअभावी कोणाचेही काम थांबणार नाही, याची खबरदारी घेत नऊ जिल्ह्यांमधील फाईल्स मागवून त्यावर स्वाक्षऱ्या करीत आहे. अर्जदारांना प्रमाणपत्र लवकर मिळतील, याची दक्षता घेतली जात आहे.

- रविराज फल्ले, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई

पदोन्नतीवर ‘महसूल’चा अद्याप निर्णय नाहीच

राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना स्वतंत्र अध्यक्ष आवश्यक असताना सध्या अवघ्या चार अध्यक्षांवर ३६ जिल्ह्यांमधील समित्यांचे कामकाज सुरु आहे. त्याामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार व राजकीय पुढाऱ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड आहे. तरीदेखील, महसूल विभागाकडे पाठविलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आलेला नाही हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT