Lockdown Canva
महाराष्ट्र बातम्या

15 जूननंतर उठणार जिल्हाबंदी? सार्वजनिक वाहतुकीवर 50 टक्‍क्‍यांची मर्यादा

कोरोनाची परिस्थिती पाहून 15 जूननंतर जिल्हाबंदी हटवण्यात येणार आहे

तात्या लांडगे

नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीडमधील रुग्णसंख्या अपेक्षित कमी झालेली नाही. दहा जिल्ह्यांतील मृत्यूदरही कमी झाला नाही. त्यामुळे 15 जूननंतर जिल्हाबंदी उठविण्याचे नियोजन झाले आहे.

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) परिस्थिती आटोक्‍यात येत असतानाच नाशिक (Nashik), नगर (Ahmednagar), पुणे (Pune), सोलापूर (Solapur), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), बीड (Beed) मधील रुग्णसंख्या अपेक्षित कमी झालेली नाही. दहा जिल्ह्यांतील मृत्यूदरही कमी झाला नाही. त्यामुळे 15 जूननंतर जिल्हाबंदी उठविण्याचे नियोजन झाले आहे. त्या वेळी 50 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत सार्वजनिक वाहतुकीस परवानगी राहील. तर हॉटेलमधून नागरिकांना पार्सल जेवण घेण्यास परवानगी असेल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील (Disaster Management Department) विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. (The district ban will be lifted after June 15, given Corona's condition)

राज्यातील कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट थोपवून लावण्यासाठी 14 एप्रिलपासून कडक लॉकडाउन (Lockdown) करण्यात आला. त्यानंतर 28 मेपर्यंत राज्यातील तब्बल एक कोटी 13 लाख 13 हजार 534 संशयितांची कोरोना टेस्ट झाली. त्यात 20 लाख 53 हजार 65 हजार रुग्ण आढळले. मात्र, 14 एप्रिल ते 28 मे या काळात तब्बल 34 हजार 45 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता परिस्थिती सुधारू लागली असून रुग्णसंख्या व मृत्यूदरही कमी होऊ लागला आहे. मात्र, पुणे, वर्धा, ठाणे, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, नगर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील मृतांची संख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. त्यामुळे कडक लॉकडाउनचे निर्बंध 30 जूनपर्यंत कायम ठेवले जाणार आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून टप्प्या- टप्प्याने निर्बंधात शिथिलता आणली जाईल. त्यासंदर्भात ठोस नियमावली बनवली जात असून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानेही काही निर्बंध कायम राहतील, असेही सांगण्यात आले.

कोरोनाची परिस्थिती आता सुधारू लागली असून, राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हाबंदी, हॉटेल, सार्वजनिक वाहतूक अशा गर्दीच्या ठिकाणांना परवानगी देताना आणखी काही दिवस निर्बंध कायम ठेवले जातील.

- श्रीरंग घोलप, संचालक, आपत्ती व्यवस्थापन, मंबई

लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षांना परवानगी नाहीच

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची देखील शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्‍त पूर्वपरीक्षा असो वा बारावीची परीक्षा, यांना सद्य:स्थितीत परवानगी देणे उचित राहणार नाही, असा अभिप्राय आपत्ती व्यवस्थापनाने दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. बारावीसाठी अंदाजित 18 लाख तर संयुक्‍त पूर्व परीक्षेसाठी साडेतीन लाखांपर्यंत विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळल्यानंतर जिल्हानिहाय आढावा घेऊन त्या परीक्षांना मान्यता द्यावी, असेही अभिप्रायात नमूद करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : सूस, म्हाळुंगेचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुळशीतून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला राज्याची तत्त्वतः मान्यता

Best Maharashtrian breakfast in Mumbai : मुंबईची मराठमोळी चव; ११६ वर्षांची परंपरा आणि 'मामा काणे' यांच्या बटाटा वड्याची रंजक गाथा!

Sister Midnight Movie Analysis : ‘सिस्टर मिडनाइट’ चित्रपटाचा स्त्री मुक्ततेच्या शोधातील अस्वस्थ प्रवास

Water Scheme Issue : पाणी योजनेला संथ गती; जलवाहिन्या, पंपिंग स्टेशन, टाक्‍यांची कामे अपूर्ण

BMC Election: बीएमसी रणांगणात महायुतीचा मास्टरप्लॅन! भाजप आणि शिंदेसेनेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; कोण किती जागा लढवणार?

SCROLL FOR NEXT