Model Code of Conduct Now in Effect Across Maharashtra

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Nagarpalika Election: नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम कसा? आचारसंहितेचा नियम काय? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या एका क्लिकवर

Model Code of Conduct Now in Effect Across Maharashtra: राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा बिगुल! आचारसंहिता लागू, उमेदवारी अर्ज १० नोव्हेंबरपासून

तात्या लांडगे

तात्या लांडगे

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. पण, या नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या हद्दीतील मतदारांवर प्रभाव पडेल असे कार्यक्रम जिल्ह्यात इतरत्र घेता येणार नाही. तसे झाल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार असल्याने मतदारांना त्यांच्यासाठी एक आणि त्यांच्या प्रभागातील नगरसेवक पदासाठी उभारलेल्या उमेदवारासाठी एक मतदान करता येणार आहे. दरम्यान, मतदानासाठी जाणाऱ्या मतदारास मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यासंबंधीचा निर्णय आवश्यकतेनुसार तेथील मतदान अधिकारी घेतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक खर्चात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्गाच्या नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारास १५ लाख तर सदस्यांसाठी नऊ लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे.

ब वर्गाच्या नगरपरिषदांमधील अध्यक्षपदाच्या उमेदवारास ११ लाख २५ हजार रुपयांचा आणि सदस्यांसाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च करता येणार आहे. क वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये तर सदस्याच्या उमेदवारांना अडीच लाख रुपयांचा खर्च करता येणार आहे. तर ड वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारास सहा लाख रुपये तर सदस्य उमेदवारास सव्वादोन लाख रुपयांचा खर्च करण्याची परवानगी असणार आहे.

निवडणूक प्रोग्राम

  • उमेदवारी अर्ज भरणे : १० ते १८ नोव्हेंबर

  • अर्जांची छाननी : १८ नोव्हेंबर

  • हरकत नसलेल्या ठिकाणी उमेदवार अर्ज माघार : २१ नोव्हेंबर

  • हरकत असलेल्या ठिकाणी उमेदवार अर्ज माघार : २५ नोव्हेंबर

  • अंतिम उमेदवार यादी : २६ नोव्हेंबर

  • मतदान : २ डिसेंबर

  • मतमोजणी : ३ डिसेंबर

जातवैधता प्रमाणपत्राबद्दल काय नियम...

मागास प्रवर्गातून उमदेवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. ज्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही, पण त्या उमदेवाराने जात पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल तर त्याची पावती जोडावी लागणार आहे. निवडून आलेल्या उमेदवाराला निकालानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

उमेदवारी अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन

राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारास ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. एका प्रभागात एका उमेदवारास जास्तीत जास्त चार अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT