scholarship exam esakal
महाराष्ट्र बातम्या

पुन्हा पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केलेली इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती २० तारखेला होणार होती.

धनश्री ओतारी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केलेली इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या बुधवारी (ता. २०) ला होणार होती. आता ही परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेने दिली आहे.(the fifth and eighth class scholarship examinations will be held on july 31)

राज्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जातात. राज्यात एकाच दिवशी या परीक्षा घेतल्या जात असून या वर्षी परीक्षेसाठी मागील काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. राज्यातील ५,७०७ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २० जुलै रोजी एकाच वेळी या परीक्षा घेतल्या जाणार होत्या.

मात्र, ही तारीख रद्द करत ३१ जुलै २०२२ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेली अतिवृष्टी या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे धकलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

राज्यात ७.२१ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

राज्यामध्ये या परीक्षा केंद्रावर ७.२१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी ४ लाख १७ हजार ८९४, तर इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी ३ लाख ३ हजार ६९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा परिषदेकडून या परीक्षेबाबत तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT