Chitra Wagh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : 'जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही.....',चित्रा वाघ यांनी उर्फीबद्दल घेतला मोठा निर्णय

काल पोलिसांकडून उर्फी जावेदची काल चौकशी करण्यात आली

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. यामध्ये महिला आयोगाच्या नंतर आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. चित्रा वाघ यांनी अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेदच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल पोलिसांकडून उर्फी जावेदची काल चौकशी करण्यात आली आहे.

तर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेदविरोधातील आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. उर्फीवर कारवाई होईपर्यंत आणि ती पूर्णपणे कपडे घालणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे. मी एका विकृतीविरोधात बोलले तर माझ्याविरोधात सगळे एकत्र येतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी कपड्यांवरून उर्फी जावेदविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्फीवर कारवाई करण्यासाठी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली त्यानंतर काल पोलिसांकडून टीची चौकशीही करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर सोशल मीडियावर खोचक टीका केली. ट्विटरवर यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे.

राज्यामध्ये असं विकृतपणे उघडे नागड फिरणं याबाबत मी आवाज उठवला तर काय चूक केली असा सवाल त्यांनी केला आहे. कुणात किती हिम्मत आहे, तेवढ्या हिमतीने माझ्या विरोधात बोलावं आणि काम करावं. मी सर्वांना पुरून उरेल असंही चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT