mahanirmiti 
महाराष्ट्र बातम्या

महानिर्मितीचा चौथा संच लवकरच कार्यन्वित होणार; राज्याच्या क्षमतेत पडणार ६६० मेगावॅटची भर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावॅट संच क्रमांक ६चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा संच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कार्यन्वित करण्याची योजना महानिर्मितीच्या आखली आहे. हा संच कार्यन्वित होताच राज्याच्या निर्धारित वीज निर्मिती क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडेल,अशी माहिती महानिर्मितीने दिली आहे.

महानिर्मितीच्या भुसावळ संचाचे बाष्पक प्रदीपन ३० मार्च रोजी संपन्न झाले. त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा संच ऑक्टोबर २०२३मध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न सुरूअसल्याचे डॉ.नलिन सिंघल यांनी सांगितले. केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम मेसर्स भेल aकंपनी करीत असून या कामांना अधिक जलद गतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी नुकतीच दिल्ली येथे भेल कंपनीचे सी.एम.डी. डॉ.नलिन सिंघल यांची भेट घेतली.

मेसर्स भेल आणि महानिर्मिती अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत भुसावळ वीज प्रकल्पाच्या विकास कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील वीज प्रकल्प, विद्युत उत्पादन क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलते निकष, पर्यावरणीय ऱ्हास आणि घडामोडी या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात मेसर्स भेल कंपनीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ.पी.अनबलगन यांनी भेल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प), अभय हरणे, मरावीम सूत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक तसेच भेलचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्याच्या ग्रीडमध्ये ६६० मेगावॅटची भर पडणार

महाराष्ट्राच्या वीज क्षेत्राच्या दृष्टिकोनातून भुसावळ ६६० मेगावॅट हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यावर्षी राज्याच्या ग्रीडमध्ये ६६० मेगावॅटची भर पडणार आहे. भुसावळ मधील ६६० मेगावॅट क्षमतेचा पहिला आणि कोराडीच्या ३ संचांनंतर हा महानिर्मितीचा चौथा संच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT