Shinde Vs Thackeray  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Thackeray Vs Shinde : "बंडामुळे नाही तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे सरकार पडलं"

शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं.यानंतर मागच्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची यावरून वाद सुरू आहे. यादरम्यान आता शिवसेनेत पडलेल्या या फूटीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद पूर्ण केला. आज शिंदे गटाचे वकील हरिश साळवे युक्तिवाद करत आहेत. यावेळी त्यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडण्याला एकनाथ शिंदे आणि समर्थकांचा बंड नाही तर उद्धव ठाकरे यांनी वेळेच्या आधी राजीनामा दिला म्हणून पडल असल्याचं शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी म्हंटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी करण्याच्या आधी राजीनामा दिला. त्यांनी त्यांचं बहुमत सिद्ध केलं नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ होता त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंना 30 जून पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती. त्याआधी त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे इतर कोणत्याही बाबी यांना अर्थ राहत नाही.

बहुमत चाचणीला त्यावेळचे सरकार सामोरे गेले नाही. जर बहुमत चाचणी झाली असती. उद्धव ठाकरे यांचा बहुमत सिद्ध करण्याआधी दिलेला राजीनामा यामुळे ठाकरे गटासमोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

हरिश साळवे यांनी मांडलेले मुद्दे

1) उद्धव ठाकरेंना 30 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत होती.

2) वेळ असतानाही त्यांनी राजीनामा का दिला?

3) त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या बैठकीला अर्थ उरत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sagar Karivadekar Arrest : सावंतवाडीत मोठी कारवाई! शेअर ट्रेडिंगमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड सागर कारिवडेकर अखेर गजाआड

ChatGPT बनला ज्योतिषी! तुमचा हात दाखवा अन् भविष्य जाणून घ्या; वापरुन बघा 'हे' 3 प्रॉम्प्ट, हस्तरेषा वाचण्याचा व्हायरल ट्रेंड

Video: 'काय संबंध? मनू भाकरला वैभव सूर्यवंशीबद्दल प्रश्न का विचारले?' सोशल मीडियावर संतापाची लाट

Salim Wastik: 31 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात! ‘Ex-Muslim’ युट्यूबर निघाला कुख्यात अपहरणकर्ता, वाचा थरारक inside story

Post-Meal Watermelon and Bloating: आरोग्यासाठी चांगलं असलेलं कलिंगड जेवणानंतर खाल्ल्याने पोट का फुगतं? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT