Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: "सरकारला याची लाज वाटायला हवी"; ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल

पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले म्हणत केली टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात मान्सूनने हजेरी लावली. पहिल्या पावसातच मुंबईची पावसामुळे झालेली तुंबई पाहण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणीसाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. शिंदेंच्या मुंबई भेटीवर ठाकरे गटाकडून आता तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

तर मुंबईत एका तासात ७० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे मिलन सब-वे, अंधेरीसह काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं यावेळी काही गाड्या वाहताना दिसून आल्या तर काहींनी आपल्या गाड्या दोरीने बांधल्याचे दिसून आले. तर पाणी साचलेल्या भागात पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी मिलन सब-वेला भेट दिली. यावेळी मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याबाबत माध्यमांनी प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी “पाऊस आला त्याचं स्वागत करा, साचलेल्या पाण्यावर काय बोलताय?” असं वक्तव्य केलं. त्यावरून आता सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.(Latest Marathi News)

“पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत. अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन-तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे. शनिवारी रात्री मुंबईत एका तासात 70 मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले. यावेळी पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असेही वादे मिंधे-फडणवीस सरकारने जोरशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसले”, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.(Latest Marathi News)

“७० मिलीमीटर पावसामुळे जर मुंबईची ही दशा होत असेल तर पुढील दोन-तीन महिन्यांत आपली काय दुर्दशा होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यात मुंबईकरांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनाच‘तक्रारी काय करता, पावसाचे स्वागत करा,’ असा अजब ‘सल्ला’ मुख्यमंत्री मिंधे यांनी दिला आणि जनतेच्या जखमेवर मीठच चोळले.(Latest Marathi News)

वास्तविक, २४ तासांत तब्बल १२०० तक्रारी जनतेला का कराव्या लागल्या यावर मिंधे-फडणवीस सरकारने चिंतन करायला हवे”, अशा शब्दांत ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. तर शिंदे यांनी केलेल्या ‘जिकडे पाणी तुंबले तिकडच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि जिकडे तुंबणार नाही तेथील अधिकाऱ्यांचा सत्कार करू,’ या वक्तव्यावरही टीका केली आहे. आता याला ना ‘इशारा’ म्हणता येईल, ना ‘गाजर.’ ही फक्त बनवाबनवी आहे. मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात फक्त बनवाबनवीचाच खेळ सुरू आहे”, असं नमूद करत एकनाथ शिंदेंनी केलेल्या त्या वक्तव्याची आठवण ठाकरे गटाने करून दिली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT