Bhagatsingh Koshyari on shivaji maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhagatsingh Koshyari: कोश्यारींना हाकला; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचं राष्ट्रपतींना पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. परवा औरंगाबाद येथे झालेल्या विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्यांची जीभ घसरली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.

औरंगाबाद येथे बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील. असं कोश्यारी म्हणाले.

हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. परवाच्या त्यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीतील नेते संतप्त झालेले आहेत. राज्यभर आंदोलनं होत आहेत. याज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवलं आहे.

महेश तपासे म्हणाले की, राष्ट्रपतींना पत्र पाठवून कोश्यारींना एकदा समज देण्याची विनंती केली आहे. तरीही ते ऐकले नाहीत तर त्यांना दुसऱ्या राज्यात पाठवावं, अशी मागणी केल्याचं तपासे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पैशासाठीच प्रमोद महाजनांची हत्या? प्रवीण महाजन भावाला करत होते ब्लॅकमेल'; प्रकाश महाजनांच्या दाव्यावर काय म्हणाल्या सारंगी महाजन?

Gadhinglaj Accident:'मोटारीच्या धडकेत रिक्षातील महिला ठार'; आठ जण जखमी: संकेश्वर - बांदा महामार्गावर दुर्घटना

Latest Marathi News Live Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

SCROLL FOR NEXT