Bacchu Kadu esakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu: बच्चू कडूंना दिलासा; मंत्रालय आंदोलन प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

एका सरकारी पोर्टलला विरोध करीत बच्चू कडूंनी आंदोलन केले होते.

सकाळ डिजिटल टीम

आमदार बच्चू कडुंच्या मंत्रालयातील आंदोलन प्रकरणातील सुनावणी ३ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने सत्र न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी मंत्रायलयात आंदोलन केलं होतं. (The hearing of the protest case in the Ministry of Bacchu Kadu has been adjourned till April 3 )

नेमकं काय आहे प्रकरण?

26 सप्टेंबर 2018 रोजी एका सरकारी पोर्टलला विरोध करीत आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी बच्चू कडू यांनी मंत्रालयात असलेले तत्कालीन संचालक प्रदीप जैन यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी कडू यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आरोप निश्चितीसाठी सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असं विधान केलं होतं. यानंतर आसाममधील विधानसभेत जोरदार गदारोळ झाला आहे. बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडूंनी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये सोडा असे विधान केले होते, याचे पडसाद आसामच्या विधानसभेत उमटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT