Sharad pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: 'पवारांच्या निर्णयाचा देशपातळीवर परिणाम', काँग्रेसच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले.

यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले होते. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पवार यांच्या या निर्णयाचा केवळ राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीवरच नाही, तर देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळेच, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हंटलं आहे.

काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी यासंबधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की, शरद पवार हे केवळ त्यांच्या पक्षाचेच नाहीत, तर संपूर्ण देशाचे आदरणीय आणि ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहावे की नाही राहावे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. मात्र, विरोधी पक्षात त्यांचा एक वेगळंच वजन आहे. त्यामुळे, विरोधी पक्षासाठी ते काम करत राहतील, अशी मला आशा आणि विश्वास आहे, असे काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT