महाराष्ट्र बातम्या

4 वर्ष पूर्ण तरीही सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची अंबलबजावणी नाही

विनायक होगाडे

नाशिक: जात पंचायतींच्या मनमानी विरोधातील सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. पण जात पंचायतींची मुजोरी काही कमी होताना दिसत नाही. या कायद्यान्वये 110 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सरकारी पातळीवर मात्र अंमलबजावणीसाठी काहीही प्रयत्न केले गेले नाही. याबाबत जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून एका गर्भवती महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या घटनेमागे जात पंचायतचा दबाव असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले. त्यातून जात पंचायत मूठमाती अभियान सुरू झाले.

जात पंचायतच्या मनमानीची शेकडो प्रकरणे समोर आली आहे. उकळत्या तेलात हात घालणे, पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा देणे, नववधुची कौमार्याची परीक्षा घेणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, वाळीत टाकणे अशा शिक्षा जात पंचायतकडून सर्रास दिल्या जातात. प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरला. न्यायालयाने सरकारला याविषयी कायदा बनविण्यास सांगितले. जातपंचतींच्या वाढत्या अघोरी घटना लक्षात घेऊन राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला. 3 जुलै 2017 रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी नंतर तो अंमलात आला.

असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. एका बाजूने हे आश्वासक असले तरी कायद्याची अंमलबजावणीसाठी मात्र सरकार उदासीन राहिले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासन दरबारी पाठपुरावा केला. गृह विभागासोबत एक बैठकही झाली. मात्र अंमलबजावणीसाठी सरकारने काही योजना आखल्या नाहीत व प्रयत्नही केले नाही. चार वर्ष होऊनही कायद्याचे नियम अजून बनविले गेले नाही त्यामुळे तक्रार दाखल करतांना अडचणी येतात. पोलिसांत कायद्याबद्दल स्पष्टता नाही. त्यांची प्रशिक्षण शिबिर घेणे, अंत्यत अवश्यक आहे. कायद्याची शासकीय कमिटी अजून तयार झाली नाही. पीडितांना निवारा मिळावा, तात्पुरते पुनर्वसन व्हावे, आर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्नशील आहे.

"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. परंतु मर्यादा व क्षमता यांचा विचार करता हे प्रयत्न अपुरे आहेत. समिती सरकारसोबत विनामोबदला अंबलबजावणी करण्यासाठी तयार आहे. फक्त शासकीय यंत्रणाची अनुकुलतेची गरज आहे.असे झाल्यास देशासमोर हा कायदा पथदर्शक ठरेल"

- कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान

अधिक माहितीसाठी संपर्क : 9822630378

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT