kishor Aware Esakal
महाराष्ट्र बातम्या

kishor Aware Murder Case : किशोर आवारे हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, बापाला मारल्याचा घेतला बदला

अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे यांनी ही हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी ही माहिती दिली आहे.

जुन्या वादातून गौरव खळदे यांनी बदला घेण्याच्या हेतूने ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगर परिषद परिसरात माजी माजी नगरसेवक भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानशिलात लागावली होती.

याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली, तेंव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण सात जणांवर आवारे यांच्या हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं.

किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांकडून शुक्रवारी पावनेदोनच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT