nana patole sakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच! भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरवर पटोले म्हणतात,'मुख्यमंत्री म्हणून...'

भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असणाऱ्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

सध्या राज्यात एकीकडे ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर वेगवेगळ्या ठिकाणी झळकू लागले आहेत. सोशल मीडियावरही ‘भावी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, सरपंच’ अशी भावी नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशातच राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेसमधील एका नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणुन बॅनर झळकले आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उद्या (5 जूनला) वाढदिवस आहे. वाढदिवसाच्यानिमीत्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडाऱ्यात लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.या शिवाय शेतकरी पुत्र असाही उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

भंडाऱ्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मदन रामटेके आणि युवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या या बॅनरवर नाना पटोले यांच्या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. हे सर्व बॅनर नाना पटोले यांच्या गावापर्यंत लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीला काही महीन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अशातच भंडाऱ्यात लागलेल्या पोस्टर्सची चर्चा सुरू झाली आहे.(Latest Marathi News)

भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरवर नाना पटोलेंची प्रतिक्रीया

"भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेल्या पोस्टरविषयी मला समजलं, मात्र अशा प्रकारचे पोस्टर्स कोणीही लावू नयेत. माझा हा वाढदिवस मला सामाजिक कार्य करत साजरा करायचा आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांना हवं तसं शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत मी हा वाढदिवस साजरा करणार आहे."(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT