गाळप  Sakal
महाराष्ट्र बातम्या

गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये! राज्यात १३८ लाख मे.टन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन

राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख मे.टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख मे.टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला असून निर्यात केलेल्या साखरेलाही चांगला भाव मिळाला आहे.

देशात दरवर्षी सरासरी ३१२ लाख मे.टन साखर उत्पादित होते. पण, यंदा ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आणि गाळ हंगाम खूपच लांबला. राज्यातील विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ऊस शिल्लक असून काही कारखान्यांचे गाळप सुरुच आहे. राज्याच्या आजवरील गाळप हंगामात २०१८-१९ मध्ये सर्वाधिक ११२ लाख मे.टन साखर तयार झाली होती. पण, यंदा १३८ लाख मे.टनाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झाले आहे. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ८१ कोटी लिटर इथेनॉल तयार केले होते. परंतु, यंदाच्या हंगामात १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले आहे. केंद्र सरकारने निर्यातीसाठी यंदा काहीच सबसिडी दिली नाही. तरीही, राज्यातून मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात झाली आणि त्याला ३२ हजाराचा दर मिळाल्याने कारखान्यांना त्याचा मोठा फायदा झाला. शेतकऱ्यांनाही अठ्ठाविसशे रुपयांपासून तीन हजार १०० रुपयांपर्यंत एफआरपी मिळाली. इथेनॉलसाठी प्रतिलिटर ६० रुपयांचा दर मिळाल्याने बऱ्याच कारखान्यांनी त्याला प्राधान्य दिले. राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम घेतला.

  • गाळप हंगामाची वैशिष्टे...
    - १९७ साखर कारखान्यांनी पहिल्यांदाच तयार केली १३८ लाख मे.टन साखर
    - यंदाच्या साखर उत्पादनातून मिळाले ४३ हजार ८४० कोटी रुपये
    - रेक्टिफाइड स्पिरिटमधून कारखान्यांना मिळाले चार हजार कोटींचे उत्पन्न
    - को-जनरेशन व इथेनॉलमधून मिळाले १२ हजार कोटी रुपये
    - केंद्राच्या निर्यात अनुदानाशिवाय इंडोनेशिया, मध्य पूर्व आशियात ९५ लाख मे.टन साखर निर्यात

पुढील हंगाम ऑक्टोबरमध्ये
मागील दोन-तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने राज्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा त्यात आणखी वाढ झाली आहे. १६ महिन्यांहून अधिक काळ होऊनही कारखाने गाळपासाठी ऊस नेत नसल्याने बऱ्याच उत्पादक शेतकऱ्यांनी अख्खे फड पेटवून दिले. अशी परिस्थिती पुढील हंगामात होऊ नये म्हणून आगामी गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन आतापासूनच केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन तालुक्यात पाऊस

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT