Baramati
Baramati esakal
महाराष्ट्र

Baramati: बारामतीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला! दीड वर्षांच्या बालिकेवर कुत्र्यांचा हल्ला

मिलिंद संगई, बारामती

बारामती: शहरातील कॅनॉल रोडवरील खत्री इस्टेट मध्ये दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दीड वर्षांची बालिका जखमी झाली. रविवारी (ता. 23) सकाळी ही घटना घडली. खत्री इस्टेट मध्ये वास्तव्यास असलेल्या जगदाळे कुटुंबातील दीड वर्षांची मुलगी अश्वी सकाळी घरात खेळत होती. खेळता खेळता ती घराच्या दारात आली.

त्याच वेळेत तेथे असलेल्या दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी अचानकच तिच्यावर हल्ला केला. एकदमच इतकी कुत्री अंगावर धाऊन आल्यानंतर अश्वी जिवाच्या आकांताने ओरडली, कुटुंबिय क्षणार्धात धावून आल्याने तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले गेले.

हा हल्ला इतका अचानक झाला की कुटुंबियांनाही क्षणभर काय होते आहे हेच समजले नाही. इतकी कुत्री एकदम अश्वीच्या अंगावर धावून आल्यानंतर कुटुंबियांचीही पळापळ झाली.

तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवेपर्यंत वीस ठिकाणी कुत्र्यांनी तिला चावा घेतला होता. तिची ही अवस्था पाहून कुटुंबिय व शेजा-यांनी तिला तसेच उचलून तातडीने मुथा हॉस्पिटल गाठले.

डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांनी अश्वी हिला तातडीने दाखल करुन घेत तिच्यावर उपचार केले. अश्वी हिचे नशीब बलवत्तर होते म्हणून तिला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या नाहीत, मात्र या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव बारामतीकरांच्या दारापर्यंत येऊन ठेपला असल्याचे सिध्द झाले.

घराच्या दारात अश्वी खेळत असताना तिथपर्यंत कुत्र्यांनी येऊन तिच्यावर हल्ला केल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिकाचा बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

Akshaya Tritiya 2024 : सोन्याचा झुमका, हिऱ्याची अंगठी अन् बरंच काही..! अक्षय तृतीयेला पत्नीला गिफ्ट करा 'हे' दागिने

SCROLL FOR NEXT