mpsc
mpsc Media Gallery
महाराष्ट्र

आरक्षणामुळे "एमपीएससी'च्या 24 परीक्षांचा तिढा ! संयुक्‍त पूर्वपरीक्षा लांबणार

तात्या लांडगे

"एसईबीसी' प्रवर्ग रद्द झाल्यानंतर या प्रवर्गातील उमेदवारांना "ईडब्ल्यूएस'मधून कशाप्रकारे लाभ द्यावा, अशा नऊ मुद्‌द्‌यांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरकारकडे मार्गदर्शन मागविले आहे.

सोलापूर : मराठा समाजाला "ईडब्ल्यूएस' दहा टक्‍के आरक्षण नोकऱ्यांमध्येही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) पार पडलेल्या 24 परीक्षांमध्ये "एसईबीसी' आणि "ईडब्ल्यूएस' या दोन्ही प्रवर्गातील जागांचा समावेश आहे. त्यामुळे "एसईबीसी' प्रवर्ग रद्द झाल्यानंतर या प्रवर्गातील उमेदवारांना "ईडब्ल्यूएस'मधून कशाप्रकारे लाभ द्यावा, अशा नऊ मुद्‌द्‌यांवर आयोगाने सरकारकडे मार्गदर्शन मागविले आहे. (The reservation has raised questions about the 24 MPSC exams)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मागील दीड- दोन वर्षांत 24 प्रकारच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मराठा समाजाचे आरक्षण (Reservation of Maratha community) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असल्यापासून आरक्षणाच्या निकालापर्यंत त्या परीक्षांची प्रक्रिया पुढे सरकलीच नाही. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचा निकाल आणि पुढील परीक्षांसंदर्भात काय निर्णय घ्यावा, यासंदर्भात आयोगाने सामान्य प्रशासनाला आठ पानी पत्र पाठविले आहे. तत्पूर्वी, काही उमेदवारांची पूर्वपरीक्षा झाली असून मुख्य परीक्षा झालेली नाही. तर पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्यांच्या मुलाखती झालेल्या नाहीत. चिंतेची बाब म्हणजे जवळपास दोन हजारांहून अधिक उमेदवारांनी पूर्व, मुख्य व मुलाखतीत उत्तीर्ण करूनही त्यांचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. तर काहींचा निकाल जाहीर होऊनही त्यांना नियुक्‍त्या दिलेल्या नाहीत. अशा सर्व गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने आता हा पेच सोडविण्याच्या हेतूने राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. सरकारकडून मार्गदर्शन आल्यानंतरच पुढील परीक्षा व नियुक्‍त्यांबाबत अंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

आयोगाच्या पत्रातील ठळक मुद्दे...

  • पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची प्रक्रिया थांबलेल्या टप्प्यावरून पुढे सुरू करावी का?

  • मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे 10 टक्‍के आरक्षण दिल्यानंतर एसईबीसीतील उमेदवारांच्या मुलाखती घेता येणार नाहीत

  • पूर्वपरीक्षा झालेल्यांना मुख्य परीक्षेची संधी देताना 12 टक्‍के एसईबीसीतील उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे 10 टक्‍के आरक्षण कसे देता येईल?

  • अभियांत्रिकी व वनसेवेची पूर्व, मुख्य परीक्षा होऊन मुलाखतीही झाल्या; आरक्षणानुसार कशाप्रकारे नियुक्‍त्या द्याव्यात?

  • राज्य सेवेची व अभियांत्रिकीची पूर्वपरीक्षा काही महिन्यांपूर्वी झाली; त्यातील एसईबीसीतील उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेला कशी संधी द्यावी?

  • काही जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यातील एसईबीसी व ईडब्ल्यूएसच्या जागांचे वाटप कसे करावे?

  • संयुक्‍त पूर्वपरीक्षा अजूनही झाली नसून ही परीक्षा घेण्यापूर्वी त्यात आरक्षणानुसार बदल करता येईल की पूर्वीप्रमाणे थेट परीक्षा घ्यावी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT