Maharashtra Corona Update Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या गटाचे नियम लागू होणार

विनायक होगाडे

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या गटाचे नियम लागू होणार आहेत. सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारचे नियम आज बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या गटाचे नियम लागू होणार आहेत. राज्यात पाच लेव्हलमध्ये जिल्ह्यांना निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, आता तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध सगळ्या जिल्ह्यांना लागू राहणार आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट सध्या धूमाकूळ घालत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 4 जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार 5 गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड यांच्या उपलब्धतेचं प्रमाण लक्षात घेऊन सर्वांत कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटात यानुसार पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार, या प्रत्येक गटानुसार निर्बंध अधिकाधिक कठोर करण्यात आले होते. मात्र, आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड उपलब्धतेचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Pune Municipal Corporation Election : नऊ प्रभागांमध्ये महिला राज; निवडणुकीत मते ठरणार निर्णायक, पुण्यात ८३ महिला नगरसेवक निवडले जाणार

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT