Chitra Wagh_Vidya Chavan 
महाराष्ट्र बातम्या

...तर राजकारणातून संन्यास घेईन; चित्रा वाघ यांचं विद्या चव्हाणांना आव्हान

"कौटुंबिक वादामुळं त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे"

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना बलात्कार पीडित महिलेला आपल्या घरी ठेऊन त्याबदल्यात भाजपच्या एका आमदाराकडून चित्रा वाघ यांनी वसूली करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला होता. यावर बोलताना त्यांनी हा आरोप सिद्ध करुन दाखवावा आपण त्याचक्षणी राजकारणातून सन्यास घेऊ, असं थेट आव्हानं चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना दिलं आहे. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, "विद्याताईंच्या या आरोपाचा मी निषेध करते. जर मी असं केलं असेल तर विद्याताईंनी हे सिद्ध करुन दाखवावं मी त्याच दिवशी राजकारणातून निवृत्ती घेईन. ती केस जी होती ती आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावेळचे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शरद पवार या सर्वांना माहिती होती. आम्ही त्या पीडित मुलीला मदत करत होतो. तिच्यासाठी केस लढायला गेलो, ती लढाई चालू होती. हे कदाचित विद्या चव्हाण यांना माहिती नसेल. कदाचित त्यांच्या कौटुंबिक वादामुळं त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. म्हणून हे उठसूठ उठून फालतूचे आरोप करत आहेत."

तुम्ही माझ्यावरती वैयक्तिक टीका करतात तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलतात तरीही मी सगळ्या गोष्टी खपवून घेते, पण तुम्ही माझ्या कामावरती प्रश्नचिन्ह उभं करालं तर ते चित्रा वाघ कधीही खपवून घेणार नाही. आजही ती मुलगी माझ्या संपर्कात आहे. विद्या चव्हाणांनी हे सिद्ध करुन दाखवावं की कुठल्या मुलीला मी माझ्या घरी ठेवून घेतलं होतं आणि कुठल्या आमदाराकडून खंडणी मागितली होती. त्यांनी मला हे सिद्धच करुन दाखवावंच. त्यामुळं आता मी अजित पवार, शरद पवार, सुनील तटकरे यांना विनंती करते की त्यांनी विद्या चव्हाण यांना बोलावून घ्यावं आणि आपण या केसवर कसं काम केलं ते सांगावं.

विद्या चव्हाण यांना दिला इशारा

माझ्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करुन तुमची झाली असेल आणखी तुम्हाला काही हौस भागवायची असेल ती तुम्ही भागवा. पण माझ्या कामावरती जर कोणी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं तर चित्रा वाघ कधीही खपवून घेणार नाही. विद्याताई चव्हाणांना हा माझा इशारा आहे. कोणी केलं? कोणी खंडणी मागितली? कुठला आमदार? नाही त्याचं थोबाड फोडलं तुमच्यासमोर तर नाव चित्रा वाघ सांगणार नाही, हे आज मला त्यांना सांगायचं आहे, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT