Ashish Shelar_Ajit Pawar
Ashish Shelar_Ajit Pawar 
महाराष्ट्र

मग इतकी वर्षे का शांत होता? अजित पवारांचा शेलारांना सवाल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सन २०१७ मध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन होणार होतं, असं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतचं म्हटलं होतं. शेलारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सल्ला देतानाच उलट सवाल केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (then why was He quiet for five years Ajit Pawar question to Ashish Shelar)

पवार म्हणाले, "२०१७ सालीच ही गोष्ट सांगायची होती ना? इतकी पाच वर्षे का थांबलात? आपण आता २०२२ मध्ये आहोत. २०१७ साली असं झालं होतं हे आज तुम्ही सांगता. पण २०१७ साली आत्ताचे नेते इकडे तिकडे होते. मग त्यावेळी त्यांची विधान वेगळी होती, आत्ता वेगळी आहेत. मागच्या अशा गोष्टी काढून काहीही साध्य होणार नाही.

सध्या महाराष्ट्रातील काय प्रश्न महत्वाचे आहेत ते पहिल्यांदा बघुयात. तर २०१७ ला असं झालं, २०१२ ला तसं झालं, २०१० ला तसं झालं यामध्ये कोणाला रस नाही. आज आपल्या महत्वाच्या समस्या काय आहेत, मुलभूत प्रश्न काय आहेत यावर चर्चा झाली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

आशिष शेलारांनी कुठला मुद्दा केला होता उपस्थित?

सन २०१७ मध्येच भाजपची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबत अंतिम बोलणी झाली होती. त्यावेळी शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा होता पण ते कायमच खिशात राजीनामे घेऊन फिरत होते आणि टीका-टिपण्णी सुरु होती. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापण्याची भाजपची इच्छा होती. त्यानुसार पालकमंत्री कोण असतील हे देखील ठरलं होतं. पण नंतर भाजपचं वरिष्ठ नेतृत्वाकडून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन्याचं ठरलं. पण तेव्हा शिवसेनेसोबत आमचं जमूच शकणार नाही, असं सांगत राष्ट्रवादीनं या युतीला नकार दिला. पण नंतर २०१९ मध्ये शिवसेनेला भाजपची युती सोडावी आणि राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाण्यास काहीही वावगं वाटलं नाही. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशा आपल्या भूमिका बदलतात हे भाजपला चांगलंच माहिती आहे, असं शेलार यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT