महाराष्ट्र

कोरोनाचा उद्रेक! महाराष्ट्रातील ८ शहरांनी केंद्राची चिंता वाढवली

सकाळन्यूजनेटवर्क

महाराष्ट्रात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. देशभरात आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये राज्यातील रुग्णांची संख्या ६२ टक्के असल्याचं दररोजच्या आकडेवारीनं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे.  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी देशातील वाढत्या कोरोना महामारीवर चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्वात वेगानं कोरोना रुग्णवाढ होणाऱ्या दहा शहरांची नावं जाहीर केली. या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील ८ शहरांचा समावेश आहे. दिल्ली आणि बंगळुरु शहर वगळता इतर सर्व शहरं महाराष्ट्रातील आहेत. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर या आठ शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. सोमवारी सांयकाळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ३१ हजार ६४३ नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर देशात २४ तासांत ५६ हजार २११नवीन रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीवरुन राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज येईल. 

शहराचं नाव उपचाराधीन रुग्ण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या
पुणे ५९४५७ ८२८३
मुंबई ४६२४८ ११६६५
ठाणे  ३५२६४ ५९५४
नागपूर  ४५३२२ ३८०७
नाशिक २६५५३ २१९०
औरंगाबाद २१२८२ १३३९
नांदेड १५१७१ ७४७
अहमदनगर ७९५२ ११९३
बंगळुरु शहर १६२५९ ४५९०
दिल्ली ७४२९ ११०१६

गेल्या २५ दिवसांत राज्यातील कोरोनाचे रुग्ण २० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत ही वाढ चार पटीने असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. राज्यातील कोविडमध्ये गेल्या २५ दिवसांत २०.३२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ४ ते २८ फेब्रुवारीला नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत मार्चच्या आकडेवारीत सहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. राज्यभर चाचण्यांची संख्या वाढत असल्याने आकड्यांत भर पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय कोविड नियमांचे पालन न करणारे नागरिकही या वाढीस कारणीभूत आहेत. आकडेवारीनुसार १ ते २५ मार्चदरम्यान राज्यात ४,३९,३६६ रुग्ण नोंदले गेले. त्यातुलनेत ४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान १,१९,०६८ रुग्णांची नोंद झाली होती. या आकडेवारीनुसार राज्यात चार पटीने जास्त रुग्णसंख्या वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT