hsc exam
hsc exam  file photo
महाराष्ट्र

राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत आजही निर्णय नाही!

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चा झाली. मात्र, आजही यावर निर्णय झाला नाही. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. (There is no decision even today regarding the 12th standard examinations in the state)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यापाठोपाठ राज्य सरकारने २० एप्रिल रोजी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, बारावीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं जाहीर केलं होतं. ‘सीबीएसई’नं बारावीच्या परीक्षेबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितलं होतं. त्याप्रमाणे एक जूनला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सीबीएसईनंतर राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थांचं लक्ष आहे, यावर आज निर्णय होईल असं असं अपेक्षित होतं. मात्र, यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजही निर्णय होऊ शकला नाही. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्णयानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

गायकवाड पुढे म्हणाल्या, 'गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांनी घेतलेल्या निर्णयावरही चर्चा करण्यात झाली. आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबतचा प्रस्ताव सुपूर्त करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना महामारीसंदर्भातील महत्वाचे निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानंतर घेण्यात येत आहेत. त्यामुळे आपत्ती विभागाच्या अहवालानंतर बारावीच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सुरक्षितता आणि आरोग्यमय वातावरण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. कोरोनाची परिस्थिती असाधारण परिस्थिती असल्याने सरकारलाही असाधारण निर्णय घ्यावे लागत आहेत.'

राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT