Chaggan Bhujabl_Nawab Malik 
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांचा राजीनामा नाहीच; भुजबळांकडून सरकारची भूमिका स्पष्ट

शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं स्पष्ट केली भूमिका

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : नवाब मलिक यांच्याकडून सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत. भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं आपली भूमिका स्पष्ट केली.

भुजबळ म्हणाले, ही दुर्देवाची गोष्ट आहे की, पहाटे नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. तिथून त्यांना घेऊन ते सकाळी सहा वाजत्या आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. यानंतर चौकशी करुन त्यांना कोर्टात घेऊन गेले. दरम्यान, सन १९९२ सालच्या घटना तसेच सन १९९९ सालच्या जागेचा करार आणि त्यानंतर बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. तत्पूर्वी या घटनांमध्ये अनेकांवर कारवाया झाल्या पण यामध्ये नवाब मलिकांचं नाव कुठेही नव्हतं. मग आत्ताच त्यांच्यावर कारवाई का केली जातेय. तर नवाब मलिक हे सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत. भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

शरद पवार, मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची आणि तिन्ही पक्षांची एकत्रिपणे बैठक झाली. यामध्ये या अन्यायाविरोधात कायदेशीररित्या आणि जनतेत जाऊन आम्ही मुकाबला करायचं ठरवलं आहे. त्यानुसार उद्या दहा वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तिन्ही पक्षांचे मंत्री आणि नेते निषेध म्हणून धरणं आंदोलन करणार आहोत. त्यानंतर परवापासून राज्यभर तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन तालुका, जिल्हा आणि शहर पातळीवर विविध प्रकारे शांततेनं आंदोलन होईल.

नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपचं आरोप केले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंना देखील अटक झाली होती, मग त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता का? केंद्रीय यंत्रणा विशिष्ट हेतून काम करत आहे हे सर्व देशाला माहिती आहे. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळं जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची शिक्षा आम्ही तरी करणार नाही. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले ती परिस्थिती वेगळी होती. कारण मंत्र्यांचे राजीनामे घेऊन एक विकेट पडली दुसरी पडली अस सांगण्याचा आसुरी आनंद आम्ही भाजपला घेऊ देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT