eknath shinde ,ayodhya  esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत चुक की...; गंभीर गुन्ह्यातील आरोपी CM शिंदें सोबत विमानातून अयोध्याला

रुपेश नामदास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक अयोध्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले होते. शिंदेंच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होत.

मात्र एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात चक्क गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सिद्धू उर्फ सिद्धेश अभंगे नावाचा गुन्हेगार एकनाथ शिंदे यांच्या विमानातून अयोध्यासाठी गेला होता. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "काय हा 'फडतूस'पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का देवेंद्रजी? या ट्विटमुळे चर्चांना उधान आलं आहे.

ठाण्यातील सहाय्यक आयुक्त महेश आहिर यांच्यामुळे आधिवेशनात रान पेटलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धेश अभंगे नावाचा गुन्हेगार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्याला गेल्याने अशा आरोपींना मुख्यमंत्री पोसतात का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोण आहे सिद्धेश अभंगे?

सिद्धेश अभंगे हा अट्टल गुन्हेगार आहे. त्यांच्यावर खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सिद्धेशविरुद्ध ठाण्यातील कोपरी, चितळसर, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो यू ट्यूबचा भाई म्हणून कुख्यात आहे. त्याला याआधी तडीपारही करण्यात आले होते. सामाजिक संस्था चालविणारा सिद्धू नेहमी गाड्याच्या ताफ्यात फिरत असतो. ठाणे रेल्वे पार्किंगचे ठेके त्याच्याकडे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT