These are the 5 children of leaders who won 1st time in Vidhan Sabha 2019
These are the 5 children of leaders who won 1st time in Vidhan Sabha 2019 
महाराष्ट्र

'या' बड्या नेत्यांची मुलं पहिल्यांदाच विजयी| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणूकीचा निकाल हाती येऊ लागला असून, बड्या नेत्यांची मुले पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. विधानसभेत मोठ्या संख्येने युवा चेहरे पाहायला मिळणार आहेत.

1) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. मात्र, ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीने निवडणूक लढवली आणि जिंकलीही. शिवसेनेसाठी मुंबईतला सर्वात सुरक्षित मतदारसंघ असलेल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे.

2) वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान या विजयामुळे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.

3) लातूर ग्रामीण मतदारासंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि आमदार अमित देशमुख यांचा भाऊ धीरज देशमुख या मतदारसंघात मैदानात होते. अमित आणि धीरज या दोन्ही भावांनी त्यांच्या मतदारसंघात विजय मिळवला. धीरज देशमुखांना पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवण्यात यश आले आहे.

4) दापोली मतदारसंघातून योगेश कदम विजयी झाले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेशने राष्ट्रवादीच्या संजय कदम यांचा पराभव केला. योगेशने पहिल्यांदाच विजय मिळवताना राष्ट्रवादीच्या ताब्यातला मतदारसंघ खेचून आणला.

5) श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरेंनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता वडील लोकसभेत आणि मुलगी विधानसभेत असे चित्र पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT