maratha reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठा आंदोलकांवरील ‘हे’ गुन्हे मागे! सोलापूर शहर-जिल्ह्यातील कोणावरही नसणार आता गुन्हा, वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले...

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर आतापर्यंत सोलापूर शहरात सात तर ग्रामीणमध्ये ५९ गुन्हे दाखल गुन्हे होते. ग्रामीणमधील आठ गुन्हे वगळता आंदोलकांवरील ५१ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर आतापर्यंत सोलापूर शहरात सात तर ग्रामीणमध्ये ५९ गुन्हे दाखल गुन्हे होते. ग्रामीणमधील आठ गुन्हे वगळता आंदोलकांवरील ५१ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारने देखील त्यासंदर्भातील माहिती मंगळवारी (ता. २) मागवून घेतली आहे.

आतापर्यंतच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठा आंदोलकांवर हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, या सारखे गुन्हे दाखल आहेत. पण, पोलिसांनी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. चार्जशीट तयार होण्याआधी सरकार थेट शासन निर्णय काढून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ शकते. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार गुन्हे माघारी घेतले जातात. जनहितार्थाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जातो. चार्जशीट तयार झाले नसल्यास सरकार थेट गुन्हे मागे घेऊ शकते. पण, चार्जशीट तयार होऊन कोर्टात केस गेली असल्यास सरकार कोर्टाला विनंती करून केसेस मागे घेऊ शकते.

तत्पूर्वी, जिल्हास्तरावर समिती नेमून पोलिस व सामान्य प्रशासनातील अधिकारी जिल्ह्यातील अशा गुन्ह्यांविषयी अहवाल तयार करून संबंधितांवरील गुन्हे माघारी घेण्यासंदर्भातील अहवाल तयार करतात. कोरोना काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे लोकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात आले. त्याच धर्तीवर मराठा आंदोलकांरील गुन्हे मागे घेतले आहेत.

कोणते गुन्हे मागे घेतले जातात?

फौजदारी प्रक्रिया संहितेत पोलिसांनी लोकांवर दाखल केलेले गुन्हे माघार घेण्याची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. त्यात सरकार जीआर काढून किरकोळ स्वरुपाचे गुन्हे माघारी घेऊ शकते. यामध्ये रस्ता अडवणे, सार्वजनिक वाहतूक विस्कळीत करणे, कलम १४४ चे उल्लंघन करणे, असे गुन्हे असतात. पण, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशनवर हल्ले करणे, जीवाला धोका पोहोचवणे, लाखोंच्या संपत्तीचे नुकसान करणे, असे गुन्हे गंभीर मागे घेतले जात नाहीत.

शहर-ग्रामीणमधील गुन्ह्यांची स्थिती

  • १) सोलापूर शहरात मराठा आंदोलकांवर सात गुन्हे दाखल आहेत. त्यातील पाच केसेस कोर्टात दाखल असून दोन केसेस कोर्टातच प्रलंबित आहेत. ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील अहवाल सोलापूर शहर पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.

  • २) ग्रामीणमध्ये मराठा आंदोलकांवर ५९ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ४० गुन्हे परत घेतले असून ११ गुन्ह्यांचे अंतिम चार्टशिट कोर्टात पाठविलेले नाही. केवळ आठ गुन्हे प्रलंबित असून तेही मागे घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी, सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळालं; मनोज जरांगेंनी पुन्हा ठामपणे सांगितले

ENG vs SA: मॅजिकल कॅच! दोन बोटांनी चेंडू झेलायला गेला, तो निसटला अन्... Joe Root लाही विश्वास नाही बसला Video

Latest Maharashtra News Updates : "मला फक्त एवढेच सांगायचे आहे की शुल्क लादणे ही चांगली गोष्ट नाही"- राम दास आठवले

Marathi Serial : 'थोडं तुझं..' नंतर फक्त 9 महिन्यात या मालिकेचं शटर बंद ! मालिकांच्या वेळेतही महत्त्वपूर्ण बदल

Jalna Scam : अन्य खात्यांवर वळविला पैसा, अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण; आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती संकलन सुरू

SCROLL FOR NEXT