Solapur Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

चोरट्यांकडून आयटी इंजिनिअरवर कोयत्याने वार! मैत्रिणीसोबत फिरायला गेल्यावर सोरेगावजवळ रात्री 10.30 वाजता घडला थरार; मित्रासाठी अर्धा किमी धावत गेली मैत्रीण अन्‌...

दिवाळीनिमित्त नवीन दुचाकी घेतलेला आयटी इंजिनिअर व्यंकटेश बुधले (वय २५, रा. भारती विद्यापीठाजवळ) हा मैत्रिणीसोबत विजयपूर रोडवर फिरायला गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास अंधारातून आलेल्या तिघांनी सुरवातीला व्यंकटेशला गळ्यातील सोन्याचे चेन मागितली. व्यंकटेशनने नकार दिला आणि त्यांच्यात झटापट झाली. त्यात एकाने व्यंकटेशच्या कपाळावर कोयत्याने वार केला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीनिमित्त नवीन दुचाकी घेतलेला आयटी इंजिनिअर व्यंकटेश बुधले (वय २५, रा. भारती विद्यापीठाजवळ) हा मैत्रिणीसोबत विजयपूर रोडवर फिरायला गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास अंधारातून आलेल्या तिघांनी सुरवातीला व्यंकटेशला गळ्यातील सोन्याचे चेन मागितली. व्यंकटेशनने नकार दिला आणि त्यांच्यात झटापट झाली. त्यात एकाने व्यंकटेशच्या कपाळावर कोयत्याने वार केला. त्यानंतर जखमी व्यंकटेशला ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

११ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील आवंती नगरातील एका हौसिंग सोसायटीत चौघेजण घुसरले. त्यांनी दोन घरांमध्ये प्रवेश करून चाकू गळ्याला लावून त्याठिकाणी जबरी चोरी केली होती. त्यातील दोघे अजूनही फरार असतानाच सोमवारी (ता. २०) रात्री विजयपूर रोडवर दुसरी गंभीर घटना घडली आहे. जेवणानंतर व्यंकटेश मैत्रिणीसोबत फिरायला गेला होता. सोरेगावजवळील मुख्य रस्त्यापासून थोड्या अंतरावरील आतील रस्त्यावरुन वळण घेऊन सोलापुरात येताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तिघांनी चोरून नेली. मैत्रिणीच्या गळ्यातील चेन देखील हिसकावली, पण झटापटीत तुटून चेन अंधारात खाली पडली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, राजन माने, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलिस निरीक्षक सुशांत वराळे, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने आदींनी धाव घेतली. घटनास्थळी ‘फॉरेन्सिक’ची वाहने पोचली होती. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्याठिकाणी पोलिसांच्या गाड्यांचीही मोठी गर्दी दिसत होती. आता तिन्ही संशयितांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

झटापटीत तिघे म्हणाले, ‘आम्हालाच मारतो का’

अंधारातून व्यंकटेशच्या दुचाकीसमोर आलेल्या तिघांनी त्याला मारहाण सुरू केली. गळ्यातील चेन हिसकावली. त्यावेळी व्यंकटेशची त्या तिघांबरोबर झटापट झाली. त्यावेळी ते मराठीतून म्हणत होते, ‘आम्हालाच मारतो का’. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर गुन्हे शाखेचे श्वान पथक घटनास्थळी बोलावण्यात आले होते. तेथून कच्च्या रस्त्याने, जवळच्या शेतातून पुढे रस्त्यापर्यंत श्वान पथक गेले, पण पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागले नाही.

‘ती’ अर्धा किमी पळत गेली अन्‌...

व्यंकटेशच्या कपाळावर दरोडेखोरांनी कोयत्याचा वार केला होता. काहीवेळात तो चक्कर येऊन रस्त्यावर कोसळला होता. रात्रीच्या अंधारात कोणीही आजूबाजूला नव्हते. त्यामुळे व्यंकटेशसोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरड करीत अर्धा किलोमीटरवरील आदित्य हॉटेल गाठले. तेथील लोक धावत आले आणि व्यंकटेशला दवाखान्यात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून नागरिक दाखल

Colombia Plane Crash : आणखी एक भीषण दुर्घटना ! धावपट्टीवर उतरण्याआधीच विमान कोसळले, दोन खासदारांसह १५ जणांचा मृत्यू

Ajit Pawar Plane Crash : दोन्ही वैमानिकांना प्रदीर्घ अनुभव; दोघांचाही मृत्यू

Ajit Pawar: कर्तृत्ववान भाच्यासाठी रडला मामाचा वाडा

Ajit Pawar : अजितदादांची सावलीसारखी सोबत; अपघातात विश्‍वासू अंगरक्षकाचेही निधन

SCROLL FOR NEXT