Gold Theft Sakal
महाराष्ट्र बातम्या

चोरट्यांचे लक्ष एकट्या आजीबाईंवर! पार्सल आल्याचे सांगून घरात शिरले अन्‌ आजीचे दागिने जबरदस्तीने नेले; करमाळ्यातही अशीच घटना, घरांसमोर सीसीटीव्ही नाहीत

घराच्या पाठीमागून आलेल्या दोघांनी ‘तुमचे पार्सल आले आहे’ असे सांगून ७६ वर्षीय आजीबाईला दरवाजा उघडायला लावले. दरवाजा उघडताच एकाने आजीला खाली दाबून बसविले आणि दुसऱ्याने त्यांच्या हातातील व गळ्यातील दागिने जबरदस्तीने काढून नेले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शनिवारी (ता. २) रात्री आठ-सव्वाआठच्या सुमारास घराच्या पाठीमागून आलेल्या दोघांनी ‘तुमचे पार्सल आले आहे’ असे सांगून ७६ वर्षीय आजीबाईला दरवाजा उघडायला लावले. दरवाजा उघडताच एकाने आजीला खाली दाबून बसविले आणि दुसऱ्याने त्यांच्या हातातील व गळ्यातील दागिने जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी कमल राजाराम सुतापे (वय ७६, रा. सुपाते वस्ती, बाळे स्टेशन) यांच्या फिर्यादीवरून सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

आजीबाईची मुले नवी मुंबईला असतात याची माहिती घेऊनच चोरट्यांनी तुमच्या मुलांनी तुमच्यासाठी पार्सल पाठविल्याचा बहाणा करून त्यांना घराचा दरवाजा उघडायला भाग पाडले. घरामागील शेतातून पायी आलेल्या चोरट्यांनी आजीच्या हातातील अडीच लाख रुपयांच्या पाटल्या, ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि डाव्या हातातील १५ हजार रुपयांची अंगठी, असा एकूण तीन लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी जो रस्ता येण्या-जाण्याचा आहे, त्या रस्त्याचा वापर केला नाही. त्या रस्त्यावर एका घरावरील सीसीटीव्हीतून फिर्यादी कमल सुपाते यांचे घर दिसते. त्या सीसीटीव्हीत लांब अंतरावर दोघे दिसतात, पण त्यांचे चेहरे दिसत नाहीत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी बरीच माहिती संकलित केली असून त्यांचा शोध सुरू आहे.

मुले मुंबईला, रेकी करूनच चोरी

फिर्यादी कमल सुपाते यांची मुले नवी मुंबई येथे असतात. मुलांनी बाळे स्टेशन परिसरातील सुपाते वस्तीत पाच महिन्यांपूर्वीच आईसाठी नवे घर बांधून दिले आहे. आजी घरी एकट्याच असतात, त्यांच्या अंगावर दागिने खूप असतात याची पाहणी करूनच चोरट्यांनी हा डाव साधला असावा, असा अंदाज पोलिसांना आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ज्येष्ठेस मारहाण करून चोरट्यांनी दागिने लुटले

सोलापूर : शनिवारी (ता. २) रात्री आठच्या सुमारास घराचा दरवाजा पुढे करून झोपलेल्या रतनबाई किसन गायकवाड (वय ७०, रा. वाशिंबे, ता. करमाळा) यांना चोरट्यांनी मारहाण केली आहे. दोन चोरट्यांनी रतनबाई यांच्या तोंडावर, खांद्यावर, पाठीवर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची बोरमाळ व कर्णफुले जबरदस्तीने ओढून नेली आहेत. रतनबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रतनबाई या गावात एकट्याच रहायला असून त्यांचा सावत्र मुलगा शेतात राहायला आहे. त्या एकट्याच असल्याची संधी साधून गावातील एकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची बाब तपासात समोर आली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर तपास करीत आहेत.

लाखांचा बंगला, पण सीसीटीव्ही नाही

७६ वर्षीय आजी, आई घरी एकटीच राहायला असता त्यांच्या मुलांनी काही लाखांचा बंगला बांधून दिला होता. पण, आजीबाई किंवा घराच्या सुरक्षिततेसाठी घरासमोर एक-दोन सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा नव्हता. घटनास्थळावर पोलिसांना ही बाब आवर्जून जाणवली. वाशिंबे येथील घटनेतही असाच प्रकार पोलिसांना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update: नारायणगडाच्या वतीने जरांगे पाटलांचा सन्मान

Dhananjay Munde: काही जणांना आता ओबीसीतून आरक्षण हवं पण... धनंजय मुंडे पहिल्यांदा आरक्षणावर बोलले, भगवानगडावर वादळी भाषण

Kolhapur Shahi Dussehra : शाही दसरा सोहळा, अडीचशे वर्षांची परंपरा; हत्तींची जागा घेतली मेबॅक मोटारीने, छत्रपतींची अगवाणी पोलिस दलाकडून

Nashik News : 'पिवळं सोनं' महागलं! दसऱ्यासाठी गोदाघाटावर झेंडू फुलांची मोठी आवक, किलोला दीडशे रुपये दर

Sakal Relief Fund:'पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच'; सातारा जिल्ह्यातील दानशूर सरसावले; ‘सकाळ’कडे निधी सुपूर्द

SCROLL FOR NEXT