esakal
esakal
महाराष्ट्र

Tribal Society Survey : आदिवासी समाजाचे तिसरे सर्वंकक्ष वस्तुनिष्ठ सर्वेक्षण; 26 वर्षांनंतर सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Tribal Society Survey : आदिवासी समाजाची एकूण लोकसंख्या, कुटुंबसंख्या आणि इतर अनुषांगिक बाबी यांची माहिती होण्यासाठी तसेच वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकी माहिती उपलब्ध होण्यासाठी आदिवासींचे तिसरे बेंचमार्क सर्वेक्षण केले जाणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतंर्गत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातून या सर्वेक्षणाला सुरवात होणार आहे.

या सर्वेक्षणासाठी संस्थेला आठ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, २९० कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतची तयारी विभागाकडून सुरू आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

राज्यात पहिले बेंचमार्क सर्वेक्षण पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे १९७८-७९ मध्ये झाले होते. त्यानंतर १९९६-९७ या आर्थिक वर्षात दुसरे बेंचमार्क सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाला २६ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळेच आदिवासींच्या विकासाचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे आता गरजेचे झाले आहे.

आदिवासी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण लक्षात घेता, आदिवासी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. या सर्वेक्षणासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत ई-निविदा प्रक्रियेद्वारे संस्थेच्या सेवा घेण्यात आल्या असून, २९० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकूण आठ महिन्यांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेंचमार्क सर्वेक्षणांतर्गत माहिती संकलित करण्यासाठी गावपत्रक, पाडापत्रक, घरयादी प्रपत्र व कुटुंबपत्रक अशा चार मुलाखत अनुसूची तयार करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण होणार असून, माहिती ऑनलाइन संकलित केली जाणार आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर माहिती संकलित होणार आहे. त्यामुळे प्राप्त माहितीची छाननी करण्यास सुलभ होणार आहे. सर्वेक्षणातील माहितीच्या आधारे शासनास प्रचलित योजनांचे पुनर्विलोकन करता येऊन अधिक प्रभावी अशा नवीन योजना आखता येतील. तसेच सर्वच योजनांच्या कार्यान्वयातून सुधारणा करण्यास मदत होणार आहे.

सर्वेक्षणासाठी दोन कोटी ५० लाखांचा निधी

नंदुरबार जिल्हा प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच अनुषंगाने केंद्र शासनाने २०१९-२० करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत बेंचमार्क सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी दोन कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

सर्वेक्षणातून ही माहिती होणार उपलब्ध

या सर्वेक्षणातून आदिवासी समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक माहिती वैयक्तिक पातळीवर उपलब्ध होईल. ज्यातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी शिक्षण, आरोग्य व रोजगारविषयक नवीन उपक्रम हाती घेण्यास मदत होईल.

योजनांची आखणी व कार्यान्वयन अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी आणि शासनास धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होईल. गाव व पाड्यांचा शासकीय योजनांच्या माध्यमातून किती विकास झाला, याची वस्तुस्थितीदर्शक माहितीही उपलब्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT