sakal exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

‘या’ ४ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अधिकारावर बोट! सोलापूर जिल्ह्यात अवैध धंदे सुसाट; वाळू उपसा, हातभट्टी दारु, गुटखा विक्री, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर

शासनाने विविध विभागांमध्ये जबाबदारी वाटून दिली, पण कारवाईचे अधिकार बहुधा सर्वांनाच दिले आहेत. मात्र, शासनाच्या चार प्रमुख विभागांमधील अधिकारी आपल्या विभागाचे ते काम नाही म्हणून नियमावर बोट ठेवत आहेत. त्यामुळे अवैध धंदेवाईक निर्धास्त झाले असून, त्यांची संख्या-गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : शासनाने विविध विभागांमध्ये जबाबदारी वाटून दिली, पण कारवाईचे अधिकार बहुधा सर्वांनाच दिले आहेत. मात्र, शासनाच्या चार प्रमुख विभागांमधील अधिकारी आपल्या विभागाचे ते काम नाही म्हणून नियमावर बोट ठेवत आहेत. त्यामुळे अवैध धंदेवाईक निर्धास्त झाले असून, त्यांची संख्या-गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास वाळूचा अवैध उपसा सुरुच असून, नदीपात्रातील खड्ड्यांवरुन त्याचा अंदाज येतो. दुसरीकडे प्रत्येक २१ दिवसांनी गॅस कनेक्शनधारक कुटुंबाला घरगुती गॅस सिलिंडर मिळतो, पण वास्तविक पाहता तेवढे सिलिंडर लागतच नाहीत. त्या शिल्लक घरगुती सिलिंडरचा वापर व्यावसायिक किंवा अवैध इंधन म्हणून केला जातो. राज्यात गुटखाबंदी असताना बहुतेक पानटपरीवर गुटखा-मावा मिळतोच. याशिवाय अनेक गावात दारुबंदीचे ठराव केले, त्यासंदर्भातील निवेदने पोलिसांना दिली. मात्र, हे काम आपले नाही असे म्हणून पोलिसांकडून कारवाईतील सातत्य दिसत नाही.

1) महसूल विभाग

नदी पात्रातील वाळूवर पूर्णत: महसूलचे लक्ष असते, पण अवैध वाळू उपसा होत असल्यास तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करू शकतात. याशिवाय पोलिसही थेट कारवाई करू शकतात. मात्र, पोलिस अशा कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कारवाईचा अधिकार महसूल विभागाचा असल्याचेही पोलिस सांगतात.

------------------------------------------------------------------------------------

2) राज्य उत्पादन शुल्क विभाग

जिल्ह्यातील दोनशेहून अधिक गावांमध्ये खुलेआम हातभट्टी दारूविक्री तर १६ ठिकाणी हातभट्टी निर्मिती होते. ग्रामीण पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भातील माहिती देखील संकलित केली. पण, हातभट्टी बंद करण्याची मागणी पोलिसांकडे करूनही सातत्याने कारवाई केली जात नाही. त्यासाठी स्वतंत्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, आम्हाला गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त अशी कामे असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात.

----------------------------------------------------------------------------------

3) पुरवठा विभाग

पेट्रोलियम ॲक्टनुसार रेशनचे धान्य आणि घरगुती गॅस सिलिंडरचा वापर अवैधरीत्या होत असेल तर पोलिस देखील त्यावर कारवाई करू शकतात. दुसरीकडे अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रामुख्याने कारवाई करू शकतात. त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते. दहा दिवसांपूर्वी सोलापुरात काही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर रिक्षात इंधन म्हणून करताना अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याठिकाणी छापे टाकले. पण, कारवाईसाठी शहर पोलिसांकडून दोन पोलिस शिपाई मागितले, मात्र संबंधित वितरण विभागाच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांची वाट पाहात बसावे लागले, असाही अनुभव त्यांनी सांगितला.

-----------------------------------------------------------------------------------

4) अन्न व औषध प्रशासन

अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार राज्यात गुटखाबंदी करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाने करणे अपेक्षित होते. पण, बहुतेक पान टपऱ्यांवर गुटखा-मावा विकला जातो. पोलिस कारवाई करत नाहीत. अनेक पोलिस अधिकारी म्हणतात, तो अधिकार आमचा नसून आमच्यामागे खूप काम आहे. तर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी म्हणतात, कारवाईसाठी जाताना पोलिस कर्मचारी उपलब्ध न झाल्याने कारवाई करता आली नाही. भेसळयुक्त दूधाबाबत असाच अनुभव आल्याचे नाव न छापाण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission PC: मतचोरीच्या आरोपांवरून देशभर गदारोळ; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषदेत पलटवार! म्हणाले...

India Independence Day : विविध देशांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; बीजिंगमधील कार्यक्रमात दोन चिनी नेत्यांची उपस्थिती

Crop Damage: फुलंब्री तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मका, कपाशी व तूर पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Trump Putin Meet : अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन, ट्रम्प-पुतीन भेट; अलास्काच्या वारशाचा पुतीन यांच्याकडून उल्लेख

Nashik Water Project : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ३०७ कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT