महाराष्ट्र बातम्या

नवरदेवाने स्वत:च्याच गळ्यात घातलं मंगळसूत्र, कारण..

नववधूऐवजी नवरदेवानेच मंगळसूत्र घातल्याचं कधी ऐकलं आहे का?

शर्वरी जोशी

भारतीय संस्कृतीमध्ये विवाहसंस्थेला अत्यंत महत्त्व आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्ती नव्हे तर दोन कुटुंब जोडली जातात. मंगळसूत्र (mangalsutras), जोडवी आणि कुंकू यांना लग्नात विशेष महत्त्व आहे. या तीनही गोष्टी स्त्रीचं सौभाग्यालंकार आहेत. त्यामुळे लग्नात नवरदेव नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि या दोघांची साताजन्माची गाठ बांधली जाते. पूर्वापार काळापासून नवरदेव मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, लग्नाच्या मांडवात नववधूऐवजी नवरदेवानेच मंगळसूत्र घातल्याचं कधी ऐकलं आहे का? खरं तर या घटनेवर कोणाचाच विश्वास बसणार नाही. परंतु, एका तरुणाने हे शक्य करुन दाखवलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शार्दुल कदम या युवकाची जोरदार चर्चा रंगली आहे. (this bride and groom exchanged mangalsutras what happened next)

चर्चेत आलेल्या शार्दुल कदमवर अनेकांनी टीकास्त्रदेखील डागलं आहे. तर, अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, त्याने हा निर्णय घेण्यामागे एक खास कारण असल्याचं स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. अलिकडेच शार्दुलने त्याच्या लग्नाचा एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याने मंगळसूत्र का घातलं या मागचं कारण सांगितलं.

"मंगल या शब्दाचा अर्थ आहे शुभ आणि सूत्र म्हणजे धागा. मंगळसूत्र म्हणजे दोन आत्मा एक होणारा शुभ धागा. परंतु, समाजाचा मंगळसूत्राकडे पाहण्याच्या दृष्टीकोन अत्यंत वेगळा आहे. फक्त स्त्रीनेच मंगळसूत्र घालावं असं समाजाचा नियम आहे. मात्र, मला हे मान्य नाही. मात्र, माझ्या पत्नीवर असलेलं प्रेम दर्शवण्यासाठी मी मंगळसूत्र का घालू शकत नाही?, आमच्या नात्याचं प्रतिक म्हणून मी हा धागा का घालू नये?", असं शार्दुल म्हणाला.

दरम्यान, शार्दुलने पत्नीच्या गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं घातलं. तर, त्याच वेळी त्याच्या पत्नीने शार्दुलच्या गळ्यात काळ्या मण्यांच्या माळेत ओवलेलं एख गोल चांदीचं पेंडन्ट असलेलं मंगळसूत्र घातलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Horoscope : उद्या राम नवमीला बनतोय दुर्मिळ योग! पुढचे 6 दिवस 'या' 3 राशीच्या लोकांना हमखास धनलाभ; एका रात्रीत आयुष्यात घडेल मोठी घटना

Latest Marathi News Live Update : आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे; रुग्णवाहिकेतून थेट 'पंचायत समितीत' धडकत अनोखे आंदोलन

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीरला Sharad Pawar यांच्याकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती; काका पवारांच्या तालमीला ५० लाख

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

SCROLL FOR NEXT