zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

यंदा शाळांना १२८ दिवस सुट्या! दिवाळीची १० दिवस तर उन्हाळ्याची ३८ दिवस असणार सुट्टी; शिक्षण विभागाची सुट्यांची यादी जाहीर, कधी-कधी असणार सुट्टी, वाचा...

शालेय शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्यांची यादी जाहीर केली असून त्यानुसार शाळा तथा विद्यार्थ्यांना ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दीवाळीच्या १० दिवस (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) आणि उन्हाळ्याच्या ३८ दिवस (२ मे ते १३ जूनपर्यंत) सुट्या असणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शाळा तथा विद्यार्थ्यांना ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दीवाळीच्या १० दिवस (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) आणि उन्हाळ्याच्या ३८ दिवस (२ मे ते १३ जूनपर्यंत) सुट्या असणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशी असणार आहे. अर्ध्यावेळेची शाळा सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरेल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाजादिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १० मिनिटांच्या दोन सुट्या राहतील. दुबार पद्धतीने शाळा भरत असल्यास दहा मिनिटांची लहान आणि ३५ मिनिटांची मोठी सुटी असणार आहे.

गावच्या यात्रेचा अपवाद वगळता सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. स्थानिक परिस्थितीनुसार यादीतील तारखेला तो सण येत नसल्यास मुख्याध्यापकांनी सुटी घेण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने गटशिक्षणाधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे. मुख्याध्यापक अधिकारात सुटी घेताना संबधित मुख्याध्यापकांनी तीन दिवस अगोदर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी कळविणे बंधनकारक असणार आहे.

उर्दु माध्यमांच्या शाळांसाठी...

नियमित शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशीच राहील, पण अध्यावेळेची शाळा सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत असणार आहे. रमजान उपवासानिमित्त त्या काळात प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच या वेळेत भरतील, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वर्षभरातील सार्वजनिक सुट्या

  • जुलै : आषाढी एकदाशी, मोहरम, नागपंचमी (२ दिवस)

  • ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी (३ दिवस)

  • सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना (४ दिवस)

  • ऑक्टोबर : गांधी जयंती (दसरा) व दिवाळी सुटी (११ दिवस)

  • नोव्हेंबर : गुरूनानक जयंती (१ दिवस)

  • डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ (१ दिवस)

  • जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन (३ दिवस)

  • फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (३ दिवस)

  • मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती (६ दिवस)

  • एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (२ दिवस)

  • मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुटी (२७ दिवस)

  • जून : उन्हाळा सुटी : (१२ दिवस)

  • जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक अधिकारातील सुटी : (२ दिवस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

Ekta Kapoor : इंडियन आर्मीचा अपमान करूनही एकता कपूरवर कारवाई का झाली नाही? पोलिसांनी सांगितलं कारण, म्हणाले त्यांनी पैसे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT