MLA Ashish Shelar sakal media
महाराष्ट्र बातम्या

आशिष शेलारांना धमकी! यापुर्वी दहशतवाद्यांनीही केली होती रेकी

देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेण्याची विनंती पोलिसांना केली.

सुधीर काकडे

भाजपनेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काल मुंबईचे पोलीस (Mumbai Police) आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagarale) यांना पत्र लिहुन तक्रार केली आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रातून सांगितलं आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या तक्रारीनुसार दोन वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून त्यांना धमकीचे फोन आले आहेत. या संदर्भात तपास करण्याची विनंती त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

आमदार आशिष शेलार यांच्या कुटुंबियांना काही धमकीचे फोन आले. या फोनवर एका अज्ञान व्यक्तीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी देत, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली. त्यामुळे शेलार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी त्यांनी आपल्याला आलेल्या दोन्ही क्रमांकांची माहिती देखील पोलिसांना दिली. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेण्याची विनंती पोलिसांना केली.

शेलार यांना यापूर्वीही अशी धमकी आली होती. २०२० मध्ये देखील शेलार यांना अशी धमकी आली होती. तेव्हा सुद्धा शेलारांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी एका आरोपीला मुंब्र्यातून अटक केली होती. तर अतिरेक्यांनीही त्यांच्या घराची रेकी केल्याचं एक प्रकरण समोर आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT