Mhada Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

MHADA चा पेपर फोडण्याचा प्रयत्न, तिघांना पुण्यातून अटक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आज होणारी म्हाडाची परीक्षा (MHADA Exam Cancelled) पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Maharashtra Minister Jitendra Awhad) यांनी ट्विटरवरून केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता म्हाडाचा पेपर फोडण्याचा (MHADA Paper Leaked) प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकऱणी पुणे सायबर पोलिसांनी कारवाई केली असून तीन आरोपींना अटक केली आहे. सायबर पोलिसांच्या सातर्कतेने व mpsc समन्वय समितीच्या पाठपुराव्यला यश आले आहे.

आज म्हाडाच्या विविध पदांसाठी परीक्षा होणार होती. पण, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ जारी केला. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली. तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे आजच्या म्हाडाच्या परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा जानेवारी महिन्यात घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळी घराच्या बाहेर पडू नये, परीक्षा केंद्रावर जाऊ नये, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाडांच्या ट्विटनंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. बसेस बंद असताना आम्ही खासगी गाडी करून आलोय. ऐनवेळी परीक्षा रद्द केलीय. आता आमच्यावर बसलेला आर्थिक भुर्दंड कोण देईल? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच एका विद्यार्थ्याने म्हटलंय की, मी परराज्यात शिकायला राहतो. फक्त परीक्षेसाठी आलो आहे. आता इतका खर्च कसा सहन करायचा? असं म्हणत त्याने आव्हाडांना ट्विटरवर टॅग केले आहे. तसेच म्हाडा भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप यापूर्वीच एमपीएससी समन्वय समितीने केला होता. तरीही ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, आता mpsc समन्वय समितीच्या पाठपुराव्यला यश आले असून पेपर फुटीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT